Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women Nature: स्त्रिया या 4 गोष्टींमध्ये असतात पुरुषांपेक्षा आघाडीवर, कुणीच त्यांना हरवू शकत नाही

Women Nature : आपल्या घरातील स्त्री ही किती गुणवान असते याविषयी पुरुषांना कल्पना नसते.

कोमल दामुद्रे

Women Good Quality : आपल्या घरातील स्त्री ही किती गुणवान असते याविषयी पुरुषांना कल्पना नसते. ते तिचे काही गुण हे कधीच कोणासमोर दाखवत नाही. ती जितकी घरातली कामे व्यवस्थित पार पाडते तितकीच बाहेरची कामे करते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, सध्याच्या स्त्रिया या वर्किंग वूमन आहेत पण त्यापेक्षा त्या पुरुषांपेक्षा काही गोष्टींत आघाडीवर आहेत. चाणक्यांनी जसे त्यांचे दोष सांगितले आहेत. तसेच त्याचे गुण देखील सांगितले आहे. महिलांमध्ये असे चार गुण असतात ज्यात पुरुष त्यांना कधीही हरवू शकत नाही. महिलांचे ते 4 गुण कोणते आहेत ते जाणून घेऊया.

1. धाडसी

आचार्य चाणक्य (Chanakya) सांगतात की स्त्रिया (Women) पुरुषांपेक्षा अधिक धैर्यवान असतात. कोणत्याही वाईट परिस्थितीला ते खंबीरपणे सामोरे जातात. आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्री पुरुषापेक्षा 6 पट अधिक धैर्यवान असते. संकटाची वेळ आली की स्त्रीची हिंमत आपोआप समोर येते.

2. अधिक लवचिक आणि समजूतदार

आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्रिया त्यांच्या स्वभावाने लवचिक असतात आणि पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची त्यांच्यात जबरदस्त क्षमता आहे. हा गुण त्यांच्यात नैसर्गिक आहे आणि पिढ्यानपिढ्या चालू राहतो. जसजसे ते मोठे होतात तसतसे ते अधिक बुद्धिमान बनतात.

3. भावनिक

आचार्य चाणक्य नीती शास्त्रात म्हणतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात. पण ही त्यांची कमजोरी नसून त्यांची आंतरिक शक्ती आहे, ज्यामुळे ते प्रत्येक परिस्थितीत आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. या गुणवत्तेमुळे, ती प्रत्येक परिस्थितीशी स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जोडू शकते.

4. जास्त खाणे

आचार्य चाणक्य म्हणतात की पुरुषांपेक्षा (Men) स्त्रियांना जास्त भूक लागते. याचे कारण त्यांची शारीरिक रचना आहे, ज्यामुळे त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी अधिक कॅलरीजची आवश्यकता असते. यामुळेच महिलांना पोटभर आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT