Chanakya Niti About Parenting Saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti About Parenting: पालकांनो, या पद्धतीने कराल मुलांचे संगोपन; कधीच जाणार नाही तुमच्यापासून दूर !

Child Success Tips : मुलांमध्ये योग्य आणि अयोग्य फरक करण्याची समज पुरेशी नसते.

कोमल दामुद्रे

Child Care Tips : मुलांना योग्य वेळी वळण लावले तर त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित असते. मुलांमध्ये योग्य आणि अयोग्य फरक करण्याची समज पुरेशी नसते. त्यासाठी ते त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की, जसे पालकांना मुलांकडून अपेक्षा असतात तशाच मुलांना देखील पालकांकडून अपेक्षा असतात. वाढत्या वयानुसार मुलांना देखील मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यासाठी पालकांनी मुलांचे योग्यप्रकारे संगोपन केले तर भविष्यात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. तुमचे आणि त्यांचे नाते अधिक घट्ट होईल.

1. मुलाला त्याच्या दिवसाबद्दल विचारा

पालकांनी (Parents) मुलांना त्यांच्या दिवसभरातल्या गोष्टी विचारायला हव्या. मुले बोलत असताना या दरम्यान त्यांनी मोबाईल (Mobile) किंवा टीव्ही वापरु नये. ज्यामुळे संवाद साधताना कोणतीही अडचण येत नाही. तसेच मुलाच्या आयुष्यात काय चालले आहे किंवा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे असे काही घडले आहे की नाही हे पालकांना कळते.

2. समज निर्माण करा

पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे मूल मोठे होत आहे आणि त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होत आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात काही नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. जेव्हा पालक मुलाच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत, तेव्हा मूल त्यांच्या प्रश्नांची उत्तरे बाहेरून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून शोधू लागते. पालकांनी मुलांच्या (Child) प्रश्नांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

3. अपेक्षा नको

मुलांवर तुमच्या अपेक्षेचे ओझे लादू नका. परीक्षेत कमी गुण आल्यास त्यांना नकारात्मक शब्द बोलू नका. 'तुला जमणार नाही', 'तुम्ही मुळीच जबाबदार नाही' असे शब्द बोलू नका. काही गोष्टी मुलांच्या कलेनेसुद्धा घेणे गरजेचे असते.

4. अगदी छोट्या गोष्टींचेही कौतुक करा

जेव्हा तुम्ही लहान गोष्टींवर किंवा चांगल्या गोष्टींवरही मुलाचे कौतुक करता. तेव्हा त्यांना अभ्यास करताना किंवा शाळेत जाण्यात एक वेगळीच ऊर्जा मिळते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT