Chanakya Niti On Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Success : या लोकांकडे फिरकतही नाही वाईट काळ, असतात सतत यशाच्या वाटेवर

कोमल दामुद्रे

Success Tips By Chanakya Niti : यशाच्या वाटेवर असताना प्रत्येकाला चांगल्या- वाईट काळाला सामोरे जावे लागतेच. यशाची पायरी चढताना आपण अनेकदा अशा गोष्टी करतो ज्यामुळे अपयश सहज आपल्या मागे येते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणूस हा वाईट काळाला सामोरे जाण्यास घाबरतो, तो प्रत्येक गोष्टीला धरुन बसतो त्यामुळे तो कधीच यशाच्या मार्गावर चालत नाही. एखादा प्रसंग आपल्यावर आल्यानंतर त्यातून आपण काय शिकलो या गोष्टींचा ते विचार करत नाही म्हणून दु:ख व अपयश त्यांच्या वाटेला जास्त येते. परंतु, आपल्या आजुबाजूला असे अनेक लोक आहेत जे अपयश आल्यानंतरही यशस्वी होतात ते कसे हे जाणून घेऊया

1. सहनशक्ती

संयम हा माणसातील (Human) सर्वात महत्त्वाचा गुण आहे. कोणत्याही प्रसंगाला संयमाने सामोरे गेल्यास त्यावर आपल्याला सहज मात करता येते. एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कठीण काळी धीर धरणे खूप महत्त्वाचे असते. कारण संयमाच्या अभावामुळे, आपण स्वतःहून केले जाणारे काम अनेकदा खराब करतो. संयम बाळगणारी व्यक्ती विचार करून निर्णय घेते आणि लगेच समस्या सोडवते.

2. घाबरू नका

जीवनात (Life) सुख-दु:ख येतच राहतात. अशा परिस्थितीत दु:ख पाहून घाबरू नये. माणसाने नेहमी आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आयुष्यात कोणतीही मोठी समस्या आली तर त्याची भीती कधीही सोडू नका. त्यापेक्षा घाबरून न जाता धैर्याने समस्येचा सामना करा.अडचणीचा सामना केल्याने समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सहज सापडतो.

3. नियोजन

जीवनात यश (Success) मिळवायचे असेल तर नियोजन करणे अधिक गरजेचे आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे संपूर्ण नियोजन तयार करा. असे केल्याने, येणार्‍या समस्यांसाठी आधीच तयार असता व त्यापासून तुमची सुटका नक्कीच होऊ शकते. जे लोक नियोजन करून काम करतात त्यांना क्वचितच समस्या किंवा दुःखांना सामोरे जावे लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT