Chanakya Niti About Parenting: पालकांनो, मुलांच्या भविष्याची सतत चिंता वाटते? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

Child Success Tips : पालकांनी आपल्या मुलांना चांगली शिकवण दिली तर त्याचे भविष्य सुरक्षित होईल.
Chanakya Niti About Parenting
Chanakya Niti About ParentingSaam Tv
Published On

Parenting Tips : हल्लीच्या मुलांना सांभाळणे म्हणजे पालकांना ते अधिक त्रासदायक वाटू लागते. बदलेल्या वातावरणानुसार मुलं अधिक प्रमाणात हट्टी बनत आहे. सोशल मीडियाला ते अधिक प्रमाणात बळी पडले आहेत. त्यामुळे पालकांना चिंता वाटू लागली आहे.

आचार्य चाणक्य म्हणतात की, पालकांनी आपल्या मुलांना चांगली शिकवण दिली तर त्याचे भविष्य सुरक्षित होईल. पालकांनी चांगले वळण लावल्यास, योग्य दिशा दाखवल्यास मुले नक्कीच आयुष्यात यशस्वी होतील. ज्याप्रमाणे जेवण बनवताना आपण ते परिपूर्ण मनाने बनवतो त्याप्रमाणेच मुलाला घडवताना आपण योग्य ती शिकवण दिल्यास तो नक्कीच चांगला मुलगा भविष्यात बनू शकतो. जाणून घेऊया मुलांला घडवताना पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Chanakya Niti About Parenting
Chanakya Niti On Relationship : तुमच्या जोडीदारामध्ये आहेत का हे गुण ? असतील तर लगेच लग्नासाठी तयार व्हा !

1. सद्गुण

मुलांना (Child) आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी समाजात स्वत:चा व पालकांचा सन्मान करणे गरजेचे आहे. तसेच मोठ्याचा आदरही करायला हवा. चाणक्य म्हणतात की, पालकांनीही आपल्या मुलांमध्ये सद्गुण विकसित करून चांगले संस्कार दिले ​​पाहिजेत. हे केवळ त्याच्या वैयक्तिक विकासासाठी चांगले नाही तर समाजासाठी देखील चांगले आहे.

2. खोटे बोलू नका

मुलांसमोर आपण एकदा खोटे बोलो की, ते आपल्याशीही तसेच वागतात. कालांतराने त्यांची ही सवय बनत जाते. त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगा. तुम्ही खोटे का बोलात याविषयी देखील त्यांना सांगा. खोटे बोलल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे देखील सांगा. आपण आपल्या मुलांना सत्याच्या मार्गावर चालण्यास सक्षम केले पाहिजे.

Chanakya Niti About Parenting
Akshaya Naik : ही सुंदरा खरचं मनामध्ये भरली...

3. कष्ट

मुलांना कष्ट (hardship) करण्यास प्रेरित करा. कठोर परिश्रमाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. म्हणूनच आपल्या मुलांना मेहनती बनवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. वैयक्तिक जीवन असो, शिक्षण क्षेत्र, क्रीडा, कला किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, आपल्या मुलांना पूर्ण झोकून देऊन काम करायला शिकवा. यामुळे ते केवळ पात्रच नाहीत तर जीवनात यशस्वीही (Success) होतात.

Chanakya Niti About Parenting
Vitthal Fish Earrings Importance: विठ्ठलाच्या कर्णकुंडलात मासे का असतात ?

4. शिस्त

आपल्या मुलाला योग्य बनवण्यासाठी, मुलाला शिस्त लावली पाहिजे. जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे आणि शिस्तीनेच माणूस त्याच्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. तुमच्या मुलाला शिस्तबद्ध होण्यासाठी मदत करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com