Diabetes Control Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Control Tips : रक्तातली साखर कंट्रोल करण्यासाठी या गोष्टीचे सेवन करा, जाणून घ्या

Causes Of Diabetes : आज केवळ देशातच नव्हे तर जगभरात मधुमेह ही एक गंभीर समस्या बनली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diabetes Tips :

आज केवळ देशातच नव्हे तर जगभरात मधुमेह ही एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे केवळ वयोवृद्धच नाही तर तरुण लोकही या आजाराचे बळी ठरत आहेत. मधुमेह हा एक आजार आहे जो तुम्ही नियंत्रित करू शकता. पण ते मुळापासून नष्ट करता येत नाही. अशा स्थितीत जर तुम्ही एकदा त्याला बळी पडलात तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या जीवनशैलीबाबत सावध राहावे लागेल.

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत खूप काळजी (Care) घेणे आवश्यक आहे. जास्त वेळ उपाशी राहणे टाळा. गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यापैकी एक म्हणजे हरभरा. हरभरा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करू शकतो. सेवन कसे करावे हे जाणून घ्या.

रक्तातील साखरेवर हरभरा कसा प्रभावी ठरेल?

हरभऱ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स किंवा GI खूप कमी असते. त्यामुळे मधुमेह (Diabetes) असलेल्यांनी हरभऱ्याचे सेवन करावे. यासोबतच काळ्या हरभऱ्यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्याबरोबरच वजन कमी होण्यास मदत होते आणि हृदय, किडनी, फुफ्फुसे इत्यादीही निरोगी राहतात.

ब्लड शुगरच्या रुग्णांनी अशा प्रकारे हरभरेचे सेवन करावे

  • मधुमेहाचे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारे हरभरा खाऊ शकतात.

  • मूठभर अंकुरलेले हरभरे सकाळी लवकर खा.

  • हरभऱ्याचे पाणी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करू शकते. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात 2 चमचे हरभरे भिजत ठेवा. सकाळी ते गाळून पाणी (Water) प्या.

  • गव्हाच्या पिठाऐवजी हरभरा रोटी खा.

  • तुम्ही हरभरा उकळून खाऊ शकता किंवा सॅलड म्हणून खाऊ शकता.

  • वाटल्यास हरभऱ्याची भाजी तयार करून खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या गाडीवर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT