ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेह असलेल्या रुग्णांना खाण्यापिण्यात अनेक पत्थे पाळावी लागतात.
त्यांच्यासाठी काही चविष्ट, हेल्दी आणि झटपट बनवता येणारे स्नॅक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पॉप कॉर्न हा एक कमी कॅलरी असलेला पदार्थ आहे. हा पदार्थ डायबिटिजचे रुग्ण खाऊ शकतात.
जर तुम्हाला टाइप-२ चा मधुमेह असेल तर तुम्ही बेरी आणि दही एकत्रितपणे खाऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरेल.
बदाम हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. बदामामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
उकडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने असतात. त्यामुळे हे टाईप-२ डायबिटिज रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
डायबिटिजच्या रुग्णांसाठी फायबरयुक्त फळ फायद्याचे असते. यामध्ये सफरचंद, संत्री, केळी हे पदार्थ खावेत.
अॅवोकॅडो हे डायबिटिज रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आहे. अॅवोकॅडोमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.