Pre Diabetes Symptoms : वाढत्या वयात प्री- डायबिटीजचा धोका! वेळीच ओळखा लक्षणे, कशी घ्याल काळजी?

Pre Diabetes Treatment : सध्या सर्वत्र मधुमेहाच्या रुग्णांची संख्या खूप प्रमाणात वाढत चालली आहे.
Pre Diabetes Symptoms
Pre Diabetes SymptomsSaam Tv

Diabetes Tips :

सध्या सर्वत्र मधुमेहाच्या रुग्णांची संख्या खूप प्रमाणात वाढत चालली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की मधुमेहाची सुरुवात प्री-डायबिटीजपासून होते. प्रत्येकाला प्री-डायबिटीज बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्हाला याची माहिती असेल तर कदाचित तुम्हाला मधुमेहासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागणार नाही.

प्री-डायबिटीज आढळल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेऊन चांगले उपचार घेतल्यास मधुमेह टाळता येऊ शकतो. एका आरोग्य सर्वेक्षणानुसार, मधुमेह (Diabetes) होण्याआधी बहुतेक लोकांना प्री-डायबिटीजचा त्रास होतो. वास्तविक, त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि वर्षभरात प्री-डायबिटीजने ग्रस्त असलेले अनेक लोक मधुमेहाला बळी पडतात. त्यामुळे आज प्री-डायबिटीजच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊयात जेणेकरून तुमचा मधुमेहापासून बचाव होऊ शकतो.

Pre Diabetes Symptoms
Diabetes Test : तरुणांनो, कमी वयात मधुमेह टाळायचा आहे? ३० शी ओलांडण्यापूर्वी करा या ३ टेस्ट

प्री-डायबिटिज म्हणजे काय?

मधुमेह होण्याआधी, लोकांना प्री-डायबेटिजचा त्रास होतो. अशा स्थितीत प्री-डायबिटिज म्हणजे काय? प्री-डायबिटिज किंवा बॉर्डरलाइन डायबिटीज ही अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीला मधुमेह 2 होण्यापूर्वी उद्भवते. तसेच प्री-डायबिटिज असलेल्या रुग्णाची (Patient) रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. याच स्थितीला प्री-डायबिटीज म्हणतात. प्री-डायबिटीजमध्ये आपले शरीर अधिक इन्सुलिन तयार करते, परंतु काही काळानंतर अतिरिक्त इन्सुलिनचे उत्पादन कमी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे साखरेची पातळी वाढते आणि व्यक्ती मधुमेहासारख्या गंभीर आजारांना बळी पडते.

प्री-डायबिटीजची लक्षणे कोणती?

प्री-डायबिटीजला सायलेंट हार्ट अटॅक (Heart Attack) म्हणता येईल, कारण त्यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. प्री-डायबिटीजमध्ये व्यक्तीला वारंवार लघवी होणे, जास्त भूक लागणे, सतत थकवा जाणवणे, दृष्टी कमी होणे, हात-पायांमध्ये जास्त मुंग्या येणे किंवा ते वारंवार बधीर होणे असे अनुभव येतात. शरीरात कुठेही जखमा झाल्या तर लवकर बरे होत नाही. वजन लगेच कमी होणे, ही सर्व प्री-मधुमेहाची गंभीर लक्षणे आहेत.

प्री-डायबिटिजमुळे मधुमेहाचा धोका वाढतो

या सर्व लक्षणांनी त्रस्त असलेल्या व्यक्तीला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. एका अभ्यासानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना फक्त एका वर्षात मधुमेह होण्याचा धोका 10% असतो. प्री-डायबिटीजवर योग्य वेळी उपचार सुरू केले, तर मधुमेहाची समस्या सहज टाळता येऊ शकते. जे लोक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात ते लवकर बरे होतात.

Pre Diabetes Symptoms
Sleeping Problems Affect Diabetes | रात्रीचे जागरण करताय? तुम्हालाही जडू शकतो मधुमेहाचा आजार

प्री-डायबिटिज टाळण्याचे उपाय

  • वारंवार लघवी होणे, जास्त भूक आणि तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, प्रचंड थकवा आणि गोंधळ यांसारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि मधुमेहाची तपासणी करा.

  • हा आजार टाळण्यासाठी आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. प्रत्येकाने आपला बॉडी मास इंडेक्स (BMI) 18.5 ते 25 दरम्यान ठेवावा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.

  • दररोज सुमारे 30 मिनिटे व्यायाम आणि योगासने करावीत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी बनता.

  • जंक फूड, पॅक्ड फूड यांसारख्या आरोग्यदायी गोष्टी जपून वापराव्यात. आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. साखरयुक्त पेये पिणे टाळावे आणि कॅलरीज नियंत्रित ठेवाव्यात.

  • जर तुम्ही लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या समस्यांशी झगडत असाल तर तुम्ही वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे जेणेकरून मधुमेहाचा धोका टाळता येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com