Chakli Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Chakli Recipe : कुरकुरीत आणि कमी तेलात फुलणारी चकली; वाचा परफेक्ट रेसिपी

Chakli Recipe in Marathi : या टिप्सने बनवलेली चकली कधीच खराब होणार नाही.

Ruchika Jadhav

गोड पदार्थ खाण्यापेक्षा कुरकुरीत स्नॅक्स प्रत्येकाला खावेसे वाटतात. चहा बरोबर कुरमुरे, भेळ, शंकरपाळ्या आणि चकल्या खायला मस्तच लागतात. अशात चकली आवडत नाही असं कोणीच नाही. चकली चवीला अगदी उत्तम लागते. मात्र तिची परफेक्ट रेसिपी प्रत्येकाला जमेल असं नाही. काही व्यक्तींची चकली खुप जास्त तर काहींची चकली खुप जास्त कडक होते. काही व्यक्ती चकली बनवतात त्यात जास्त तेल जाते. त्यामुळे परफेक्ट मापासह ही रेसिपी कशी बनवायची यची माहिती जाणून घेणार आहोत.

साहित्य

तिखट - १ चमचा

हळद - १ चमचा

मीठ - चवीनुसार

ओवा - २ चमचा

सफेद तीळ - ४ चमचे

हिंग - पाव चमचा

भाजनी - ४ कप

पाणी - २ कप

कृती

सर्वात आधी २ कप भर पाणी एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला एक वाफ आली की, लगेचच त्यात हळद, मिठ, तिखट, ओवा आणि सफेद तीळ मिक्स करा. हे सर्व मिक्स केल्यावर पुढे पाण्याला एक उतकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आली की त्यात भाजणीचे पीठ मिक्स करा.

महत्वाचे

भाजणीचे पीठ पाण्यात मिक्स करताना गॅस मंद आंचेवर ठेवा.

पीठ झटपट पाण्यात मिक्स करण्याचा प्रयत्न करा.

पीठ पाण्यात मिक्स करण्यासाठी जास्त वेळ लागला तर चकली कडक होते.

पीठ मस्त शिजवून घ्या. पीठ शिजत असताना त्यावर एक छिद्र असलेलं झाकन ठेवा.

हे झाकन पूर्ण बंद असल्यास त्यात सर्व वाफ पिठात विरघळते.

वाफ पिठात गेल्याने चकल्या फार जास्त तेल पितात.

पुढे पीठ छान शिजले की, एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. पीठ छान थंड होऊ द्या. नॉर्मल टेंप्रेचर झाल्यावर पीठ छान मळून घ्या. पाण्याचा हात घेऊन तुम्ही पीठ आणखी पातळ मळून घेऊ शकता. पीठ मळून मऊ झालं की, ते चकलीच्या भांड्यात भरून घ्या. चकलीच्या सोऱ्यामध्ये पीठ भरल्यावर त्यापासून एक एक करत सर्व चकल्या तयार करून घ्या. तयार चकल्या तुम्ही कढईभर तेलात तळू शकता. चकली चळता तेल कडकडीत तापलेलं नसावं. तेल गरम झाल्यावर गॅस कमी करा. त्यानंतर मंद आंचेवर चकल्या तळून घ्या.

या सिंपल टिप्स फॉलो करत तुम्ही चकली बनवल्यास ती चकली अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनते. अशी चकली इतकी चविष्ट लागते की घरात सर्व व्यक्ती अशी चकली फस्त करतात. या सिंपल टिप्समुळे तुमच्या चकलीमध्ये जास्त तेल सुद्धा राहणार नाही. चकली अगदी कमी तेल पियेल. चकली कमी तेलात कुरकुरीत होईल. अशी चकली तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. तसेच चहा बरोबर सुद्धा या चकलीचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT