चपाती गोल गरगरीत आणि फुललेली असावी असं प्रत्येकाला वाटतं. अशीच चपाती खाणे सर्वांना आवडतं. तुम्हाला देखील अशीच चपाती खायला आवडत असेल. मात्र परफेक्ट चपाती बनवणे जरा कठीण आहे असं प्रत्येकाला वाटतं. अशात सध्या सोशल मीडियावर एका तरुणीने हात मोडलेला असताना देखील सुंदर चपाती बनवली आहे.
या तरुणीने न लाटता आणि पीठ न मळता सुंदर चापाती बनवली आहे. तिची चपाती इतकी मऊ आणि गोल बनली आहे की हात मोडलेला असताना अशी चपाती कुणी बनवू शकतं यावर विश्वास बसणार नाही. चला तर या तरुणीने चपाती नेमकी कशी बनवली आहे याची माहिती जाणून घेऊ.
गव्हाचे पीठ
पाणी
मीठ
तेल
सर्वात गव्हाचे पीठ एका वाटीत काढून घ्या. त्यानंतर या पिठामध्ये आवडीनुसार मीठ मिक्स करा. मिठ मिक्स केल्यावर त्यात एक चमचा तेल मिक्स करा. तसेच नंतर पाणी टाकून पिठ भिजवून घ्या. पिठाता पाणी मिक्स करताना तुम्ही स्टिलच्या फेटण्याच्या चमच्याने देखील हे फेटून घेऊ शकता.
पीठ अगदी पातळ करून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने डोसे बनवता अगदी तसेच पीठ बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पीठ तयार केल्यानंतर हे पीठ १० मिनिटे असेच झाकून ठेवा. त्यानंतर डोसे बनवतात तसे थोडे पीठ चमच्यात घेऊन तव्यावर टाकून घ्या.
गोलाकार चमचा गॅसवर हळूवार फिरवा. याने पिठाला सुद्धा चांगला गोलाकार मिळेल. पीठ अशा पद्धतीने तव्यावर टाकल्यानंतर चपातीला वरच्या बाजून थोडे बबल्स येतील. वरती असे बबल्स दिसले की तपाती पलटी करा. त्यानंतर यावर तेल लावून घ्या. असे करत दोन्ही बाजून छान भाजून आणि शेकून घ्या. तयार झाली पीठ न मळता आणि न लाटता तुमची टम्म फुगलेली गोलाकार चपाती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.