झटपट आणि पोटभर नाश्ता म्हणून चहा-चपातीकडे पाहिले जाते. पण नियमित चहात चपाती बुडवून खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. कारण गहू आणि साखर हे कॉम्बिनेशन चांगल्या आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे चहात चपाती बुडवून खाण्यापूर्वी त्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या.
पोटाचे आरोग्य बिघडते
तज्ज्ञांचे मते, चहा आणि चपाती एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. शरीरातील कफ वाढून कफचे इतर विकार निर्माण होण्याचा धोका वाढतो. चपाती ही गहूपासून बनवलेली असते. त्यामुळे चपाती आणि दूध एकत्र खाताना शरीराला धोका वाढतो. हे कॉम्बिनेशन आरोग्याला हानी पोहचवते. बद्धकोष्ठता आणि ॲसिडीटीची समस्या उद्भवते. पचनासंबंधित समस्या निमार्ण होऊन पचनक्रिया विस्कळीत होते.
वजन वाढते
अनेक जण चहामध्ये जास्त साखर घालून खातात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. जास्त साखरेमुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. परिणामी वजन वाढण्याचा धोका वाढतो.
हृदयाचे आरोग्य
सकाळी अनेकांना गरमागरम चहामध्ये चपाती बूडवून खाण्याची सवय असते. यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. कारण याचा हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. चहा-चपातीमुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते. मात्र यात पोषक घटकांचा अभाव असतो. याचे सेवन केल्यास कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट मिळत नाही.
इतर समस्या
चहा आणि चपाती एकत्र खाल्ल्याने केस गळती आणि पांढऱ्या केसांची समस्या उद्भवते. तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. उदा. सर्दी, खोकला, ताप. चहा आणि चपातीमुळे त्वचेवर काळे डाग पडून चेहऱ्याचे सौंदर्य धोक्यात येते.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.