Central Government Meta Saam Tv
लाईफस्टाईल

Central Government Meta: मेटाचा केंद्र सरकारसोबत करार, कौशल्य विकासाच्या माध्यमातून नवउद्योजकांना होणार फायदा

Meta Tie Up With Central Governments: META ने आज शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उपक्रम मंत्रालयासोबत तीन वर्षाचा करार केला आहे.

कोमल दामुद्रे

Skill Development :

देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी META ने आज शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उपक्रम मंत्रालयासोबत तीन वर्षाचा करार केला आहे. या करारमध्ये शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात META च्या कार्याला पूरक ठरेल.

Meta ने नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्युअरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट (NIESBUD), ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) सोबत लेटर ऑफ इंटेंट (LoI) वर स्वाक्षरी केली. या करारामुळे ५ लाख नवोदित उद्योजकांना सात भाषांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल मार्केटिंग कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

केंद्रीय कौशल्य आणि विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या उपक्रमात भारताला (India) जगतिक कौशल्याची राजधानी बनवण्यास मदत करेल. या नव्या करारामुळे डिजिटल (Digital) क्षेत्रातून सर्वत्र पोहचण्यास मदत होईल.

यामुळे विद्यार्थी, तरुण, कामगार आणि लहान उद्योजकांना भविष्यात विकसित तंत्रज्ञानाशी जोडण्यात येणार आहे. यामुळे 'अमृत पिढी' नव्या युगातील समस्या सोडवणाऱ्या कौशल्यास मनुष्यबळ आणि उद्योजकांमध्ये त्याचे रुपातंर होईल असे नमूद करण्यात आले आहे.

देशातील लोकशाही आणि लोकसंख्येला तंत्रज्ञानाशी जोडणे गरजेचे आहे. या करारामुळे आपल्याला लोकसंख्येला डिजिटल कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी आणि लहान उद्योजक आणि व्यवसायांना (Business) सशक्त करण्यासाठी बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेटाच्या भारतातील उपाध्यक्ष संध्या देवनाथन म्हणाल्या, भारताच्या G20 अध्यक्षपदाने डिजिटल परिवर्तन उपक्रमांमध्ये आपले यश जगाला दाखवले आहे. रोजगार निर्मिती, सर्जनशील अर्थव्यवस्था आणि कौशल्य विकासापासून वापरकर्त्यांची सुरक्षा आणि शिक्षणापर्यंत भारताच्या G20 प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी Meta ने अनेक कार्यकारी गट आणि एजन्सीसोबत भागीदारी केली आहे.

भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या वर्षात शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयासोबतची ही भागीदारी, भारताचा डिजिटल समावेश, कौशल्य निर्माण आणि आर्थिक वाढीचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सरकारसोबत काम करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण आहे. ते पुढे जाण्याच्या ध्येयाच्या अनुषंगाने आहे. हे समुदाय तयार करण्याच्या आणि जगाला एकत्र आणण्याच्या आमच्या मूल्यांशी देखील जोडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT