SIM Card New Rules : 52 लाख कनेक्शन बंद, 66 हजार WhatsApp खाते ब्लॉक, सिम कार्ड घेण्यासाठी बदलले नियम

DoT Rules : सरकारने मोबाइल फोनसाठी सिम कार्ड व्हेरिफिकेशनसाठी नवीन नियम जाहीर केले होते.
SIM Card New Rules
SIM Card New RulesSaam Tv

Fake Sim Care Issue :

वाढते सायबर क्राइम आणि शेकडो अनोळखी सिमवरुन आपल्या अनेक नवे मेसेज आणि कॉल येत असतात. त्यासाठीच सरकारने मोबाइल फोनसाठी सिम कार्ड व्हेरिफिकेशनसाठी नवीन नियम जाहीर केले होते. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिमची तपासणी करण्यात आली होती. सिमकार्ड विकणाऱ्या डिलर्सनाही सिमकार्डची पडताळणी करावी लागणार आहे.

यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून आतापर्यंत ५२ लाख कनेक्शन बंद करण्यात आले आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, सरकारने ६६००० खोटी व्हॉट्सअॅप खाती ब्लॉक केली आहेत आणि 67,000 सिम कार्ड डीलर्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. तसेच यात ३०० हून अधिक लोकांवर फसवणूकच्या अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आले आहे.

SIM Card New Rules
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

फसवणूकीला (Fraud) बळी पडणाऱ्या नागरिकांसाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे. हे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील आणि टेलिकॉम ऑपरेटरना ३० सप्टेंबरपूर्वी सर्व 'पॉइंट ऑफ सेल' (POS) नोंदणी करावी लागेल. नोंदणी नसलेल्या डीलर्सद्वारे सिमकार्ड विकल्याबद्दल दूरसंचार ऑपरेटर्सवर 10 लाख रुपयांचा दंडही दूरसंचार विभागाने जाहीर केला आहे.

1. काय आहे DoT चा नवा नियम

  • DoT च्या नवीन नियमांनुसार, Airtel आणि Jio सारख्या टेलिकॉम कंपन्यांच्या सिम विकणाऱ्या दुकानांसाठी KYC अनिवार्य झाले आहे.

  • केवायसीशिवाय सिम विकल्याबद्दल टेलिकॉम कंपनीला प्रति दुकान 10 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.

  • नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. अशा परिस्थितीत KYC 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण करावे लागेल.

  • ग्राहकांसाठीही सिम खरेदी करण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.

SIM Card New Rules
Marriage Numerology: या दिवशी जन्मलेल्या मुली असतात बेस्ट वाईफ, तुम्ही देखील यात आहात का?

2. हे नियम ग्राहकांसाठी बदलले आहेत

सिमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही नियम बदलण्यात आले आहेत. नवीन सिम कार्ड खरेदी करताना आपली आधार पडताळणी केली जाते. सध्या कार्ड खराब झाले किंवा सिमकार्ड हरवले तर ते पुन्हा नव्याने जारी करणे आवश्यक असल्याचे नवीन नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे. जर तुमच्याकडे आधीपासून सिम कार्ड असल्यास आणि ते हरवले किंवा खराब झाले असल्यास, ते पुन्हा मिळवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com