Video Editing Course  Saam tv
लाईफस्टाईल

Video Editing Course : कमी पैशांत शिका व्हिडीओ एडिटिंग, महिन्याला कमवा लाखों रुपये कसे ते जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Career In Video Editing : 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे काय ? हा प्रश्न सगळ्यांच विद्यार्थ्यांना सतावतो. पुढच्या शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे असा विचार सध्या प्रत्येकजण करत असतो.

जर तुम्हाला क्रिएटीव्ह काम करण्याची आवडत असेल, तर आम्ही तुम्हाला एक अशा करिअर (Career) क्षेत्राबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही आपल्या क्रिएटीव्हीटीचा वापर करून लाखोंमध्ये कमवू शकता.

सध्याचे जग टेक्नॉलॉजिच्या मदतीने दररोज नवनवे शोध लावत प्रगती करत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन सॉफ्टवेअर येत असतात. त्यामुळे यांच्यावर काम करणाऱ्यांची सध्या बाजारात खूप मागणी आहे. याच सॉफ्टवेअर्सपैकी एक म्हणजे 'व्हिडिओ एडिटिंग'.

सध्या हे सॉफ्टवेअर (Software) चालवणासाठी व्हिडिओ एडिटरची प्रचंड मागणी आहे. व्हिडिओ एडिटर हे चित्रपट आणि इतर व्हिज्यूअल मीडियामध्ये काम करणारे व्यावसायिक असतात. व्हिडीओ एडिटर्सची पोस्ट प्रोडक्शनच्या कामात महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यावर साउंड ट्रॅक, फिल्टर्स, मोशन इत्यादी कामांची जबाबदारी असते.

आपण जेव्हा एखादा व्हिडिओ पाहातो तेव्हा त्यामध्ये लावण्यात आलेल्या एकूण फ्रेम्स, व्हिडिओ मागील संगीत, व्हिडिओचे प्रभावी सादरीकरण हे सर्व काम व्हिडिओ एडिटरचे असते. साधी चित्रफिती उत्तम व्हिज्युअल्स आणि संगीताच्या मदतीने नयनरम्य बनवण्यामागचे सर्व श्रेय व्हिडिओ एडिटरचे असते. एखाद्या व्हिडिओला शूट करण्यासाठी कितीही कालावधी लागत असला तरी त्याचे मुख्य काम एडिटिंगमधूनच पूर्ण होते.

1. व्हिडिओ एडिटर बनण्यासाठी काय करावे?

व्हिडिओ एडिटर बनवण्यासाठी आपण या क्षेत्रात डिप्लोमा किंवा डिग्री करू शकता. याशिवाय आजकाल अनेक संस्थाकडून हा कोर्स डिग्री किंवा डिप्लोमाशिवाय शॉर्ट टर्म कोर्सच्या माध्यमातून कमी खर्चात (Money) दिला जातो. ज्याच्या शेवटी आपल्याला प्रमाणपत्र देखील दिले जाते.

12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग कोर्स केल्यास विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. व्हिडिओ एडिटिंगमध्ये उत्तम काम करायचे असेल तर जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक असते. सुरुवातीला एका व्हिडिओ एडिटरला महिना 30 ते 40 हजार पगार असतो. पण जसजसा त्याचा अनुभव वाढत जातो, तसा त्याचा पगारही वाढतो. काही वर्षातच व्हिडिओ एडिटरला लाखांच्या घरात पगार मिळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT