बदलेल्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच इतर गोष्टी देखील बदल्या आहेत. कामाचा वाढता ताण, प्रदूषण, झोपेची कमतरता आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक आजारांना बळी पडावे लागते.
सध्या हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. अनेक सेलिब्रिटीसोबतच सर्वसामान्यांना देखील आपला जीव गमवावा लागत आहे. हार्ट फेल्युअर ही हृदयाशी संबंधित गंभीर समस्या आहे. यामध्ये हृदयाला व्यवस्थित रित्या रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये आणि इतर ऊतकांमध्ये द्रव तयार होतो.
झोपेत असताना हृदयाला व्यवस्थित रित्या रक्तपुरवठा मिळाली नाही की, त्याची विविध लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या. दुर्लक्ष केल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. झोपेत कार्डियक अरेस्ट कसा येतो, लक्षणे कोणती दिसतात जाणून घेऊया सविस्तर
1. पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्पनिया (PND)
हृदयाला (Heart) व्यवस्थितरित्या रक्त पुरवठा न मिळाल्यास श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागतो. ज्याला पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्पनिया म्हणतात. ही तक्रार झोपेच्या काही तासांनंतर घडते असे ज्यावेळी होते तेव्हा उठून बसावे.
2. श्वास घेण्यास अडचण(ऑर्थोप्निया)
कार्डियक अरेस्टमध्ये झोपेच्या (Sleep) दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी उशीची मदत घ्या किंवा ताठ बसा. या स्थितीला ऑर्थोप्निया म्हणून ओळखले जाते.
3. जलद हृदयाचा ठोका (टाकीकार्डिया)
हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न मिळाल्यास हृदयाचे ठोके अधिक जलद होतात. ज्यामुळे आपल्या झोपेतून जाग येऊ शकते.
4. छातीत दुखणे
झोपेत अचानक छातीत दुखू शकते. याला अॅसिडीटी म्हणून दुर्लक्ष करु नका, असे वारंवार होत असल्यास डॉक्टरांनी संपर्क साधा.
5. खोकला आणि घरघर
फुफ्फुसांमध्ये द्रव साठल्याने रात्री खोकला आणि छातीत घरघर होऊ शकते. यामध्ये तोंडातून फेस येणे किंवा गिळायला त्रास होऊ शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.