Fish Bone Stuck in Throat : मासे खाताना घशात काटा अडकला तर? लगेच करा हे उपाय

कोमल दामुद्रे

नॉनव्हेज प्रेमी

नॉन व्हेज प्रेमींना मासे दिसले की, त्यावर ताव मारण्यास सुरुवात करतात.

मासे खाण्याचे फायदे

मासे खाल्ल्याने दूरदृष्टी सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते तर त्वचा सुधारण्यास देखील मदत होते.

स्मरणशक्ती वाढण्यास मदत

स्मरणशक्ती दृढ करण्यासाठी देखील मासे फायदेशीर मानले जातात परंतु, घाई घाईत मासे खाताना त्याचा काटा घशात अडकला तर

हा उपाय करुन पाहा

मासे खाताना घशात काटा अडकल्यास आपल्याला त्रास होऊ लागतो. कितीही काही केले तरी तो सहजासहजी निघत नाही. अशावेळी हा उपाय करा

पाणी प्या

मासे खाताना घशात काटा अडकल्यास लगेच पाणी प्या. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो आत निघून जाईल.

केळी खा

केळी खाल्ल्याने घशात अडकलेला काटा खाली सरकण्यास मदत होईल. ज्यामुळे घशातील आतील भागाला इजा होणार नाही.

भाताचे दोन-तीळ गोळे खा

काटा घशात अडकल्यास भाताचे दोन-तीन गोळे न चघळता गिळा ज्यामुळे आराम मिळेल.

Next : कोकणातला 'अंजिक्य किल्ला' आहे समुद्रात, येथील विलोभनीय दृश्य तरुणाईला घालते भुरळ