Car Loan EMI Calculator Saam Tv
लाईफस्टाईल

Car Loan EMI Calculator : स्वस्त कर्ज देणार बँक कोणती? 10 लाखांच्या कार लोनवर 5 वर्षांसाठी किती भरावा लागेल EMI? Calculation समझून घ्या

Car Loan : तुम्ही कार खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंटनंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेऊ शकता.

Shraddha Thik

EMI Calculator :

अनेक लोक नवीन कार घेण्यासाठी कार लोन घेतात. तुम्हाला आवश्यक असल्यास, तुम्ही कार खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंटनंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेऊ शकता. डाउन पेमेंट पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त डाऊनपेमेंट आणि कमीत कमी कार लोन घेणे हा शहाणपणाचा निर्णय आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.

कार लोन घेतल्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ठराविक रक्कम मासिक हप्ता म्हणजेच EMI म्हणून भरावी लागते. अशा स्थितीत, जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून पाच वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे कार लोन घ्यायचे असेल, तर तुम्ही अर्ज करण्यापूर्वी तुमचा EMI सुद्धा काढू शकता. हे तुम्हाला तुमचे बजेटचे बॅलेन्स (Balance) करण्यात मदत करेल.

SBI कार कर्जावरील व्याज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही 3 ते 5 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसह नवीन कारसाठी कार कर्ज (Loan) घेतले तर तुम्हाला 8.90 टक्के ते 9.60 टक्के (SBI) व्याजदर मिळेल. कर्जावर लागू होणारे व्याज तुमच्या क्रेडिट स्कोअरवर किंवा CIBIL स्कोअरवर अवलंबून असते. आणि रक्कम तुमच्या उत्पन्नावर आणि बँकेच्या नियमांनुसार लागू केले जाते. जर तुम्ही प्रमाणित मानकांनुसार कार कर्ज घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही.

EMI किती होईल?

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 8.90 टक्के दराने (जेव्हा तुमचा CIBIL स्कोअर (Score) खूप चांगला असेल) 10 लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांत परतफेडीच्या आधारावर घेतले, तर SBI कॅलक्युलेटरनुसार, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20,710 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला रुपयांचा मासिक हप्ता (EMI) भरावा लागेल. अशा प्रकारे, संपूर्ण पाच वर्षांमध्ये, तुम्ही एकूण 2,42,591 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्याल.

जर तुमचा CIBIL स्कोअर खूपच कमकुवत असेल आणि तुम्हाला हे कर्ज 9.60 टक्के व्याज दराने SBI कार लोन मिळते. तर तुमच्या EMI कॅलक्युलेटरनुसार, तुमचा EMI 21,051 रुपये मासिक असेल. या आधारावर तुम्ही बँकेला फक्त 2,63,046 रुपये व्याज द्याल. हा आकडा तुम्हाला समजून घेण्यासाठी आहे. वास्तविक आकडेवारीसाठी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT