Cancer risk Maharashtra saam tv
लाईफस्टाईल

Cancer Risk: महाराष्ट्रात कॅन्सरचा धोका कमी; बीड-धाराशिवमध्ये परिस्थितीत अजूनच दिलासादायक, अभ्यासातून माहिती समोर

Cancer risk Maharashtra: संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कर्करोगाचा धोका कमी आहे आणि विशेषतः मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून आले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारतात ११ टक्के लोकांना कॅन्सरचा धोका आहे.

  • मिजोरममध्ये कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे.

  • आयझोल हे भारतातील सर्वाधिक कॅन्सरग्रस्त ठिकाण आहे.

गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. भारतही या गंभीर आजाराच्या विळख्यात सापडला आहे. राष्ट्रीय कॅन्सर नोंदणी कार्यक्रमाने (National Cancer Registry Programme) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यातील आकडे चिंतेत टाकणारे आहेत.

या अहवालानुसार, भारतातील जवळपास 11 टक्के लोकांना भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्यात ईशान्य भारत विशेषतः धोक्यात असल्याचं दिसून आलं. मिजोरममध्ये कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. पुरुषांमध्ये हा धोका 21.1 टक्क्यांपर्यंत असून महिलांमध्ये 18.9 टक्क्यांपर्यंत आहे.

धोका कुठे कमी आणि जास्त?

या अभ्यासामध्ये गेल्या पाच वर्षांतील 43 पॉप्युलेशन बेस्ड कॅन्सर नोंदणी केंद्रांचे आकडे तपासण्यात आले. त्यात 7,08,223 कॅन्सर रुग्ण आणि 2,06,457 मृत्यूंचा समावेश आहे. मिजोरमची राजधानी आयझोल हे सर्वाधिक कर्करोगग्रस्त ठिकाण ठरले आहे. याठिकाणी दर एक लाख पुरुषांपैकी 256 जणांना आणि दर एक लाख महिलांपैकी 217 जणींना कॅन्सर होण्याची शक्यता आहे.

याउलट सर्वात कमी कॅन्सरचा धोका असलेल्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतोय. महाराष्ट्रातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये कॅन्सरचा धोका सर्वात कमी असल्याचे आढळले. एकूणच ईशान्य भारतातील सहा जिल्हे, काश्मीर खोरं आणि केरळ हे या आजाराने सर्वाधिक प्रभावित प्रदेश आहेत. महानगरांमध्ये पाहिले तर हैदराबादमध्ये दर एक लाख महिलांमध्ये 154 कॅन्सर रुग्ण आढळले.

दिल्लीतील स्थिती

देशाची राजधानी दिल्लीही या बाबतीत मागे नाही. दिल्लीमध्ये दर एक लाख पुरुषांपैकी 147 जण कॅन्सरया विळख्यात सापडण्याची शक्यता असल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आकडा आहे. मात्र, महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण या अहवालात वेगळं नमूद केलेलं नाही.

कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय?

  • बदलती जीवनशैली (धूम्रपान, मद्यपान, जंक फूड)

  • वाढते प्रदूषण आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ

  • शारीरिक हालचालींचा अभाव

  • तपासणी वेळेवर न करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करणं

  • कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक कारणं

तज्ज्ञांचे मत आहे की, जर लोकांनी हेल्दी लाइफस्टाइल स्वीकारली आणि नियमित हेल्थ चेकअप केले, तर कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

भारतात कॅन्सरचा सर्वाधिक धोका कोणत्या राज्यात आहे?

मिजोरममध्ये कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे.

भारतातील सर्वाधिक कॅन्सरग्रस्त शहर कोणते?

मिजोरमची राजधानी आयझोल हे सर्वाधिक कॅन्सरग्रस्त शहर आहे.

दिल्लीतील पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका किती टक्के आहे?

दिल्लीत दर एक लाख पुरुषांपैकी १४७ जणांना कॅन्सरचा धोका आहे.

महाराष्ट्रात कॅन्सरचा धोका सर्वात कमी कोठे आहे?

उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये कॅन्सरचा धोका सर्वात कमी आहे.

कॅन्सरचे प्रमुख कारण कोणते

बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि अनुवांशिकता कॅन्सरची मुख्य कारणे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT