Flu during festive season: उत्सव काळात श्वसन संसर्ग वाढण्याचा धोका; प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Preventing illness during festivals: सध्या सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. या काळात कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत एकत्र येणे, पार्ट्यांमध्ये सामील होणे आणि प्रवास करणे वाढते. पण याच गर्दीमुळे श्वसन रोगांच्या संसर्गाचा धोकाही वाढतो.
Flu during festive season
Flu during festive seasonsaam tv
Published On

राज्यभरात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान आपलं आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. श्वसन संसर्ग दूर ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करा. प्रत्येकाने उत्सवाचा आनंद घेत असताना आपल्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.

गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि एकत्र येऊन साजरा सण आहे, जो सर्व वयोगटातील व्यक्ती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शिवाय आपल्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला आणि समाजाला एकत्र आणतो. सार्वजनिक गणेशोत्सवात दर्शनासाठी झालेली आणि त्या गर्दीत खोकणं, शिंकणं आणि अगदी बोलणं याद्वारे देखील विषाणू आणि बॅक्टेरियाचा प्रसार होतो.

या सणाच्या काळात मुलं, वयोवृद्ध महिला, गर्भवती महिला आणि दमा किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती असुरक्षित असतात यामुळे सावधगिरी बाळगणं अधिक गरजेचं आहे.

एम्स हॉस्पिटल डोंबिवलीचे जनरल फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कुशल बांगर सांगतात की, सणासुदीचा काळ हा संसर्ग वाढीस कारणीभूत ठरु शकतो. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असल्याने सर्दी, फ्लू आणि घशाच्या संसर्गासारख्या श्वसन संसर्गांमध्ये चिंताजनक वाढ होऊ शकते. प्रत्येकाने सतर्क राहावं आणि सतत खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. निरोगी राहण्यासाठी आणि श्वसन संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं, सुरक्षित अंतर राखणं आणि हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे.

Flu during festive season
Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. अहमद खान श्वसन संसर्गाची सामान्य लक्षणं म्हणजे खोकला आणि घसा खवखवणं, वाहणारं किंवा चोंदलेलं नाक, ताप आणि अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, छातीत घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं आढळून येतात. अशी लक्षणं आढळतात विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या कळवा आणि वेळीच व्यवस्थापन करा.

Flu during festive season
Causes of cardiac arrest: हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमधील नेमका फरक काय? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं

पालकांनी आपल्या मुलांना हात धुण्याचे योग्य तंत्र शिकवा, गर्दीच्या जागी विशेषतः सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी मास्क वापरण्यास प्रोत्साहित करा. गर्दीच्या ठिकाणी मुलाला घेऊन जाणं टाळणं योग्य राहील किंवा गर्दी नसताना सकाळी लवकर बाप्पाच्या दर्शन घ्या.

Flu during festive season
Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

थोरामोठ्यांनी देखील गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा,सोबत हँड सॅनिटायझर बाळगा आणि भरपूर पाणी प्या. दमा, ब्राँकायटिस किंवा अॅलर्जी असलेल्यांनी इनहेलर किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं जवळ ठेवा. खूपच गर्दी असेल तर अशा ठिकाणी दूरुन दर्शन किंवा ॲानलाईन दर्शनाचा लाभ घ्या.

Flu during festive season
Gas and chest pain: छातीत वेदना झाल्या तर सावधान! गॅस आणि हार्ट अटॅकमधील खरा फरक समजून घ्या

घरातील वयस्कर व्यक्तींनी कमी गर्दीच्या वेळी दर्शनास जाणं किंवा ऑनलाइन माध्यमाद्वारे वापर करणे योग्य राहील. वेळोवेळी लसीकरण आणि सर्दी किंवा खोकला असलेल्या लोकांच्या संपर्कात येणं टाळा. शिंकताना आणि खोकताना तोंड झाका. ताजं, घरी शिजवलेलं अन्नपदार्थांचे सेवन करा. भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली झोप घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com