Cancer Risk Reduction Diet saam tv
लाईफस्टाईल

Cancer Risk: तुम्ही खात असलेल्या आहारामुळेही होतोय कॅन्सर; हार्वर्ड संशोधकांनी सांगितल्या डाएटच्या योग्य टीप्स

Cancer Risk Reduction Diet: सध्या चुकीची जीवनशैली आणि आहारामुळे अनेक आजारांचं प्रमाण वाढतंय. यातील एक म्हणजे कॅन्सर. मात्र तुम्ही योग्य तो आहार घेऊन कॅन्सरसारख्या आजारावर मात करू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर एक गंभीर आजार असून याचं नाव ऐकल्यावरही लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. कॅन्सरचं प्रमाण सध्या इतकं वाढलं आहे की येत्या काळात हा आजार चिंतेचा विषय बनणार आहे. आतापर्यंत अनेकांनी या आजारामुळे आपला जीव गमावला आहे. चुकीची लाईफस्टाईल, चुकीचा आहार आणि प्रदूषण हे या आजारामागील घटक आहेत.

नुकतंच हार्वर्ड विद्यापीठातील क्लिनिकल एपिडेमियोलॉजिस्ट मिंगयांग सॉन्ग यांनी सांगितलं की, काही पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. मात्र याउलट काही घटक त्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. सॉन्ग यांनी केलेल्या संशोधनात म्हटलंय की, पॅकेजमध्ये असलेले केलेले स्नॅक्स, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेलं मांस कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढवू शकतात.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स का खाणं टाळावं?

मिंगयांग सॉन्ग यांच्या सांगण्यानुसार, अशा पदार्थांमध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो. या पदार्थांमध्ये मीठ, साखर, फॅट्स आणि कमी फायबर असतात. हे घटक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. यामध्ये अ‍ॅडिटिव्ह्ज आणि कार्सिनोजेनिक घटक असतात जे शरीरावर घातक परिणाम करू शकतात. उच्च तापमानावर मांस शिजवल्याने हेटेरोसायक्लिक अमाइनसारखे कॅन्सरजन्य तत्त्व तयार होऊ शकतात.

कॅन्सरपासून वाचण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर

दही, फळे, भाज्या आणि सुकामेवा यांसारखे काही पदार्थ कॅन्सरचा धोका कमी करू शकतात. जर तुम्ही तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश केला तर कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो, असंही मिंगयांग सॉन्ग यांनी सांगितलंय.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी डाएट टीप्स

  • लाल मीटऐवजी मसूर, बीन्स, टोफू किंवा मशरूम सारख्या प्रोटीन निवडा.

  • पांढरा मैदाचा ब्रेड आणि भाताऐवजी क्विनोआ, ब्राऊन राईस आणि ओट्ससारखे धान्य खा.

  • नाश्त्यात चिप्स आणि प्रोसेस्ड स्नॅक्सऐवजी मूठभर काजू किंवा ताजी फळे खा.

  • साखर आणि गोड पेयांऐवजी, ग्रीन टी, लिंबूपाणी किंवा ताजे नारळ पाणी प्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT