Night Sweats Warning google
लाईफस्टाईल

Cancer: सकाळी उठल्यावर बेडशीट ओली दिसतेय? कॅन्सरचं असू शकतं लक्षण, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Early Cancer Symptoms: सकाळी उठल्यावर बेडशीट घामाने ओली दिसत असेल तर दुर्लक्ष करू नका. ही ‘नाईट स्वेट्स’ समस्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागतं. आजार एकदा झाला की, रुग्णासोबत संपूर्ण कुटुंब तणावात येतं. या आजारात रुग्णाला शक्यतो इतरांपासून लांब ठेवलं जातं, त्याची भांडी, कपडे, जेवण हे वेगळं ठेवलं जातं. कारण याची लागण इतरांना होऊ नये. हा आजार वाढण्यापुर्वी तुम्हाला काही लक्षणं दिसतात. जर तुम्ही ती वेळीच ओळखलीत तर नक्कीच तुम्हाला भविष्यातल्या मोठ्या संकटापासून वाचता येऊ शकतं.

कॅन्सरचं सगळ्यांत गंभीर लक्षण हे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या तुमच्या बेडशीटवर किंवा चादरीवर दिसतं. हे ओळखणं खूप महत्वाचं असतं. यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या उशी, चादर किंवा बेडशीट घामाने ओली झालेली दिसणे हे कॅन्सरचे लक्षण असते. ही समस्या किती सामान्य किंवा किरकोळ वाटते. पण अशाच समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

झोपेत येणारा जास्त घाम, त्याने कपडे आणि अंथरुण भिजणं ही समस्या अत्यंत गंभीर आहे. कारण कॅन्सरची प्रमुख लक्षणं ही अवयवांवर अवलंबून असतात. फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये (Lung Cancer)खोकताना रक्त येतं, तर आतड्यांच्या कॅन्सरमध्ये (Colon Cancer) लघवीत रक्त दिसू शकतं. यामध्ये काही लक्षणं अस्पष्ट असतात म्हणून ती दुर्लक्षित होतात. त्यापैकी एक म्हणजे सतत होणारा ‘नाईट स्वेट्स’ म्हणजेच रात्री येणारा घाम.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, थंड खोलीत झोपूनही जर नेहमीपेक्षा जास्त अंगावरचे कपडे आणि बेडशीट भिजत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॅन्सरमध्ये रात्री घाम येण्यामागे शरीर आजाराशी लढताना तापमान वाढवतं, हार्मोनल बदल होतात किंवा केमोथेरपी, रेडिएशनसारख्या उपचारांचा परिणाम असू शकतो. कॅन्सर रिसर्च यूकेनुसार, लिम्फोमा, ल्युकेमिया, किडनी कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, बोन कॅन्सर, कार्सिनॉइड ट्युमर आणि थायरॉईड कॅन्सरच्या काही प्रकारांमध्ये ही समस्या जास्त दिसते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar Video : "कठोर निर्णयांची वेळ आली!"; नसरापूर प्रकरणावर अभिनेत्री भडकली; थेट सरकारला विनंती, वाचा नेमकं काय म्हणाली?

नसरापुरात 'त्या' दिवशी काय घडलं? नराधमाने चिमुकलीला काय खायला दिलं? पोलीस तपास धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणावरुन एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

ममतांच्या बंगालमध्ये ९२% विक्रमी मतदान, पण मुद्दे मात्र गायब; नेमकं कोणाचं पारडं जड? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

8th Pay Commission: आता पगार थेट ₹18,000 वरून ₹69,000? सरकारचा हा निर्णय ठरवणार कर्मचाऱ्यांचे भविष्य

SCROLL FOR NEXT