Canada mine water saam tv
लाईफस्टाईल

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

Ancient water discovery: कॅनडातील टोरोंटो विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक आश्चर्यकारक शोध लावला आहे. त्यांनी कॅनडातील एका जुन्या खाणीत तब्बल २ अब्ज वर्षांहून अधिक जुने पाणी शोधले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • कॅनडात २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी सापडलं.

  • हे पाणी जमिनीच्या ३ किमी खोल भागात मिळालं.

  • आयसोटोपिक अॅनालिसिसद्वारे पाण्याचे वय ठरवले गेले.

कॅनडामधील शास्त्रज्ञांनी नुकतंच एका आश्चर्यचकित करणारा शोध लावला आहे. ओंटारियो प्रांतातील किड क्रीक खाणीत त्यांना पृथ्वीवरील सर्वात जुनं पाणी मिळालं होतं. हे पाणी तब्बल २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं असल्याचं सांगितलं जातंय. या २०० कोटी वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या पाण्याचा स्वाद त्यांनी घेतला आहे.

पाणी नेमकं कुठे आणि किती खोल सापडलं?

हे प्राचीन पाणी खाणीच्या जवळपास ३ किलोमीटर खोल जमिनीत मिळालं. आतापर्यंत जगात ज्या ठिकाणी जुनं पाणी सापडले होतं, त्यापेक्षा हे पाणी खूपच जुनं आहे. प्रोफेसर बार्बरा शेरवुड लोलर आणि त्यांच्या टीमने हे पाणी किती जुनं आहे हे ठरवण्यासाठी आयसोटोपिक अॅनालिसिस नावाची वैज्ञानिक पद्धत वापरली.

आश्चर्याची बाब म्हणजे हे पाणी इतक्या वर्षांपासून जमिनीत राहिलं होतं की त्यावर बाहेरील वातावरणाचा काहीच परिणाम झाला नाही. या संशोधनाबद्दलची माहिती नेचर कम्युनिकेशन्स या प्रसिद्ध वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

या शोधाचा वैज्ञानिक दृष्टीने काय अर्थ?

या पाण्यामुळे पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. पाण्यात सूर्यप्रकाश पोहोचला नव्हता, तरीसुद्धा सूक्ष्मजीवांनी तग धरून जगण्याची शक्यता असल्याचं शास्त्रज्ञ मानतात. या पाण्यात मीठाचे प्रमाण खूपच जास्त होतं. त्यामुळे ते पाणी प्रचंड खारट आणि कडू होतं. प्रा. बार्बरा यांनी स्वतः हे पाणी चाखून याबद्दल सांगितलं. मीठाचं जास्त प्रमाण आपल्याला त्या काळातील वातावरणाची झलक दाखवते.

यामुळे कोणती रहस्य उलगडणार आहेत?

कॅनडातील या शोधामुळे पृथ्वीवर जीवन कसं सुरू झालं, सूक्ष्मजीव किती काळ तग धरू शकतात आणि इतर ग्रहांवरही जीवन असण्याची शक्यता किती आहे, याबाबत नव्या गोष्टी समजण्यास मदत होणार आहे.

हा शोध आपल्याला आठवण करून देतो की, आपली धरती अजूनही किती गूढ आणि रहस्यमयी आहे. अनेक रहस्यं अजूनही जमिनीखाली लपलेली आहेत आणि ती उलगडण्याची वाट पाहत आहेत.

कॅनडामध्ये सापडलेलं पाणी किती जुनं आहे?

सापडलेलं पाणी २०० कोटी वर्षे आहे.

हे प्राचीन पाणी किती खोलीवर सापडले?

हे पाणी जमिनीच्या जवळपास ३ किलोमीटर खोल भागात सापडले.

पाणा किती जुनं आहे हे ठरवण्यासाठी कोणती वैज्ञानिक पद्धत वापरली गेली?

आयसोटोपिक अॅनालिसिस ही पद्धत पाणी किती जुनं आहे हे ठरवण्यासाठी वापरली गेली.

या पाण्याचा स्वाद कसा होता?

पाण्यात मीठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते खारट आणि कडू होतं

या शोधाचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे?

पृथ्वीच्या आरंभाच्या काळाबद्दल आणि इतर ग्रहांवरील जीवनाच्या शक्यतेबद्दल माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला,नवरा समीरचे तुकडे करत मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT