काहींना कामाच्या दगदगीमुळे पुर्ण झोप घ्यायला जमत नाही किंवा वेळ मिळत नाही. त्यात कुटुंबासोबत वेळ, इतर दैनंदिन कामे, फिरायला जाण्यासाठी वेळ हा फक्त विकेंडलाच मिळतो. पण विकेंडला झोप पूर्ण गरजेचे आहे. कारण कमी झोपमुळे शरीरावर खूप गंभीर परिणाम होतो हे संशोधनात स्पष्ट केले आहे. पुढे याबद्दल निर्माण होणारे धोके आपण जाणून घेणार आहोत.
नुकत्याच झालेल्या युरोपच्या संशोधनात सोसायटी ऑफ कार्डियोलॉजी (ESC) आणि स्वीडनच्या जर्नल ऑफ स्लीप रिसर्च मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासांनी खूपच वेगळं आणि धक्कादायक सत्य उलघडलं आहे. आठवड्यात रोज कमी झोप घेणाऱ्यांना आणि विकेंडच्या दिवशी झोप न घेतलेल्यांना हार्ट अटॅकचा धोका निर्माण झाला आहे. जर आठवडाभर तुम्ही ७ तासांपेक्षा कमी झोप घेताय आणि आणि आठवड्याच्या शेवटी किंवा विकेंडलाही तीच झोपेची वेळ असेल तर तुमच्या हार्टवर त्याचा परिणाम होतो. किमान ९ तास झोपणं हे विकेंडचे वेळापत्रक असले पाहिजे, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
कमी झोपण्यामुळे हृदयरोगाचा धोका तब्बल २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. इतकंच नाही, तर वीकेंडला मिळणारी कॅच-अप स्लीप हलक्या प्रमाणातील झोपेच्या कमतरतेमुळे वाढणारा मृत्यूचा धोका देखील कमी करू शकते, असा अभ्यासकांचा दावा आहे.
स्वीडनमध्ये हजारो लोकांवर केलेल्या या मोठ्या अभ्यासात झोपेचा कालावधी, जीवनशैली, आरोग्य स्थिती आणि हृदयाशी संबंधित धोके यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. यात असं आढळले की, कमी झोपेमुळे शरीरातला ताण वाढतो, रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर जास्त ताण निर्माण होतो. पण वीकेंडला शरीराला थोडा जास्त वेळ विश्रांती दिल्यास हा ताण काही प्रमाणात कमी होतो आणि हृदयाची रिक्व्हर होतं.
तरीही तज्ज्ञ सावधगिरीचा इशारा देतात. झोप ही फक्त सुट्टीच्या दिवशी भरून काढायची गोष्ट नाही, तर रोजची जीवनशैली असायला हवी. सात ते नऊ तासांची नियमित झोप शरीरासाठी सर्वोत्तम मानली जाते. वीकेंडला मिळणारी अतिरिक्त झोप नक्कीच फायदेशीर असली तरी ती कायमस्वरूपी उपाय नाही. दररोज पुरेशी झोप न घेतल्यास शरीराची नैसर्गिक रचना बिघडते आणि मेटाबॉलिझम, मन:स्थिती आणि हृदयाचे आरोग्य यावर दीर्घकालीन परिणाम दिसतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.