Green Tea On empty Stomach Saam tv
लाईफस्टाईल

Green Tea On empty Stomach: सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Green Tea Benefits : ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते.

कोमल दामुद्रे

Is Green Tea Benefits For Health : अनेकांना सकाळच्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफी करण्याची सवय असते. कहींना दूधाचा चहा आवडतो तर काहींना ब्लॅक कॉफी तर काही ग्रीन टी देखील पितात. ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते.

जर तुम्ही फिटनेसचा विचार करत असाल तर शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करु शकता. तज्ज्ञांच्या मते ग्रीन टीचे सेवन केल्याने त्वचेची गुणवत्ता, चयापचय क्रिया वाढते आणि व्यक्ती दीर्घकाळ सक्रिय राहते. ग्रीन टीचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी लोक सकाळच्या व्यायामानंतर रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन करतात, जे खूप हानिकारक मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे आवश्यक आहे की नाही हे जाणून घेऊया.

1. ग्रीन टी रिकाम्या पोटी प्यावी का?

पोषणतज्ज्ञ डॉ.रोहिणी पाटील यांच्या मते, रिकाम्या पोटी ग्रीन टी (Green Tea) प्यायल्याने पोटदुखी होऊ शकते. ग्रीन टीमध्ये टॅनिन म्हणून ओळखले जाणारे पॉलीफेनॉल असते जे पोटात ऍसिडचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे पोटदुखी, जळजळ किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील होऊ शकतात. याचे सेवन जेवणापूर्वी किंवा नंतर करावे. तसेच, ग्रीन टीमध्ये कॅफिन आढळते, जे गॅस्ट्रिक ज्यूस पातळ करून पोटाला (Stomach) हानी पोहोचवू शकते. त्याचा जास्त वापर केल्याने चक्कर येणे, उलट्या होणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

2. ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

ब्रेकफास्ट करण्याच्या एक तास आधी ग्रीन टी पिऊ शकतो. सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी प्यायल्याने चयापचय गतिमान होते आणि वजन कमी करण्यात मदत होते. ग्रीन टी एका दिवसात 3 ते 4 कपपेक्षा जास्त पिऊ नये. काही लोक ग्रीन टीमध्ये दूध आणि साखर मिसळून पितात. ग्रीन टीमध्ये साखर आणि दूध मिसळणे टाळा. खाल्ल्यानंतर लगेच ग्रीन टी पिणे धोकादायक (Side effects) ठरू शकते.

3. ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ

दिवसातून ३ ते ४ कप ग्रीन टी प्यायला हवा. ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने यकृताचा त्रास होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टीचे सेव करू नका, यामुळे झोप येण्यास त्रास होऊ शकतो.

4. ग्रीन टी पिण्याचे फायदे

1. वजन कमी करण्यात मदत

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे चयापचय वाढते. चयापचय वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

2. हृदयासाठी चांगले

दररोज 1 ते 2 कप ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही याच फायदा होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashti News : निर्दयतेचा कळस; विष कालवले अन्न टाकले खायला; विषबाधेने १६ कुत्र्यांचा मृत्यू

Weather Update: राज्यभर पावसाचा अंदाज, कोकण, विदर्भाला यलो अलर्ट, जाणून घ्या हवामानाची स्थिती|VIDEO

Eng vs Ind 4th Test: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; धाकड गोलंदाजाची संघात एन्ट्री

Deep Amavasya : श्रावणाआधी दीप पूजन का करतात? पारंपरिक पद्धतीसह संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: आष्टीत श्वानांच्या अन्नात विष कालवले, विषबाधेने १६ श्वान ठार

SCROLL FOR NEXT