Kidney Stone  Saam Tv
लाईफस्टाईल

Kidney Stone : बिअर प्यायल्याने किडनी स्टोनवर मात करता येते का ? सत्य की, असत्य जाणून घ्या

Myth Or Truth Can Drinking Beer Remove Kidney Stones Know The Truth: तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात का ज्यांना वाटते की बिअर प्यायल्याने किडनी स्टोन निघतो.

कोमल दामुद्रे

Kidney Stone : तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात का ज्यांना वाटते की बिअर प्यायल्याने किडनी स्टोन निघतो. तर तुमचा हा गैरसमज आजच दूर करा, कारण असे काहीही घडत नाही, हा निव्वळ भ्रम आहे. या दाव्यात कितपत तथ्य आहे ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

अमेरिकन अॅडिक्शन सेंटरच्या अहवालानुसार, दारू पिण्याने किडनी स्टोन निघू शकतो याचा कोणताही पुरावा नाही. पण जर तुम्ही किडनी स्टोन काढण्याच्या प्रक्रियेत वारंवार दारू पीत असाल तर त्यामुळे किडनी खराब होणे, किडनी निकामी होणे, रक्तदाब, कर्करोग, कमकुवत प्रतिकारशक्ती यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

लोकांना असे वाटते की, दारू प्यायल्याने वारंवार लघवी होईल, मग शरीरातून दगड बाहेर पडणे सोपे होईल. एसीसीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दारू असो किंवा बिअर मुतखडा काढण्यास मदत करत नाही. यासाठी एकतर तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा डॉक्टरांच्या (Doctor) वेळीच उपाचारानंतर त्यावर मात करता येईल. अलीकडेच WHO ने अल्कोहोलचा एक थेंबही धोकादायक सांगितला आहे.

मॅक्स हॉस्पिटलचे डॉक्टर काय म्हणतात?

मॅक्स हॉस्पिटलच्या अधिकृत वेबसाइटवर अल्कोहोल आणि किडनीशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. बिअर प्यायल्याने सतत लघवी होते असे म्हटले जाते. अशाप्रकारे लहान दगड काढणे शक्य आहे परंतु ते 5 मिमी पेक्षा मोठे दगड काढू शकत नाही, कारण वाढीचा मार्ग सुमारे 3 मिमी आहे. असेही नोंदवले गेले आहे की जर तुम्हाला वेदना होत असताना किंवा लघवी करता येत नसेल आणि तुम्ही बिअर प्यायली तर त्यामुळे तुमची प्रकृती (health) बिघडू शकते. बिअरमुळे जास्त लघवी निर्माण होते जी तुम्ही बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे ते खूप वेदना होतात. जास्त प्रमाणात सेवन केल्याने निर्जलीकरण देखील होऊ शकते.

Beer

किडनी स्टोन का होतो?

आपल्या सर्वांना माहीत आहे की, किडनीचे (Kidney) काम रक्त स्वच्छ करणे आणि त्यातून विषारी आणि अनावश्यक पोषक तत्वे लघवीद्वारे बाहेर काढणे हे असते, परंतु जेव्हा रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढते तेव्हा किडनी ते नीट फिल्टर करू शकत नाही त्यामुळे लघवी साठून राहाते. किडनी स्टोन हे आम्ल क्षारांपासून बनलेले असतात. खालच्या ओटीपोटात एका बाजूला किंवा मागच्या बाजूला अचानक वेदना होणे हे त्याचे प्रारंभिक लक्षण आहे. दगड तयार झाल्यामुळे लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवत असेल, तर ही लक्षणे जाणवत असल्यास तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

SCROLL FOR NEXT