Buying Online Makeup Kit Saam tv
लाईफस्टाईल

Buying Online Makeup Kit : ऑनलाइन मेकअप किट खरेदी करत आहात? 'या' चुका करू नका अन्यथा, चेहऱ्याचे सौंदर्य गमवाल !

Skin care Product : टेक्नॉलॉजीमुळे आता घरबसल्या मेकअप प्रॉडक्ट खरेदी करू शकतात.  

कोमल दामुद्रे

Beauty Product : हल्ली लोक ऑनलाईन शॉपिंगला अधिक महत्त्व येतात. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉस्मेटिक्स, फुटवेअरस या सर्व गोष्टी आपण घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करतो. अलीकडच्या काळात मेकअप इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  पूर्वी मुलींना मेकअप प्रॉडक्ट्स विकत घेण्यासाठी बाजारात जावे लागायचे, मात्र टेक्नॉलॉजीमुळे आता त्या घरबसल्या मेकअप प्रॉडक्ट खरेदी करू शकतात.  

ऑनलाइन (Online) शॉपिंग करताना तुम्हाला प्रॉडक्टची वाइड रेंज मिळते तर बाजारात लिमिटेड प्रॉडक्ट उपलब्ध असतात.  तरी ऑनलाइन मेकअप प्रॉडक्ट खरेदी करताना अनेक मुलींना प्रश्न पडतात. जसे की कोणते प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी करावे.

तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंगसाठी सूचना देत आहोत त्याचे पालन करून तुम्ही योग्यरीत्या मेकअप प्रॉडक्ट खरेदी (Shopping) करू शकता.   

A. हे मेकअप प्रॉडक्ट्स ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करा

1 स्किनकेअर प्रॉडक्ट्स

ऑनलाइन स्टोरवरील रिटेलर्स अनेकदा इंटरनॅशनल ब्रँडसह  स्किनकेअर प्रॉडक्ट्सची वाइड रेंज देतात. हे स्थानिक स्टोअर मध्ये मिळणे अवघड आहे.

2 आयशॅडो पॅलेट

आयशॅडो पॅलेट  मार्केटपेक्षा ऑनलाईन खरेदी करणे अधिक सोयीचे आहे. कारण तुम्ही रंगांची तुलना करू शकता आणि त्यासोबतच इतर ग्राहकांचे प्रॉडक्ट संबंधित रिव्ह्यू पाहू शकता.

3 आय लॅशेस

आय लॅशेस खरेदी करण्यासाठी ऑनलाईन स्टोर उत्तम पर्याय आहे. कारण ऑनलाईन स्टोअर वर अनेकदा आय लॅशेस या प्रॉडक्ट्सवर  डिस्काउंट देण्यात येते.

4 काजल

ऑनलाइन स्टोरवरून काजल खरेदी करताना तुमच्यासाठी अनेक वेगवेगळे आणि चांगले ब्रँड उपलब्ध असतात.  ज्याने तुमच्या डोळ्यांना (Eye) इजा होत नाहीत.

B. हे मेकअप प्रॉडक्ट ऑफलाइन खरेदी करा

1. फाउंडेशन

फाउंडेशन ऑफलाईन खरेदी करणे फार  सोयीचे  नाही. कारण प्रत्येकाच्या त्वचेच्या टोनसाठी वेगवेगळे फाउंडेशन उपलब्ध असते त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना निवड चुकू शकते. म्हणून अशा परिस्थितीत मार्केटचा विचार करणे योग्य आहे.

2. लिपस्टिक

लिपस्टिकचा योग्य शेड मिळवण्यासाठी स्थानिक स्टोअर उत्तम पर्याय आहे. कारण लिपस्टिक ऑनलाईन खरेदी करताना स्क्रीन रिझोल्यूशन आणि लायटिंगनुसार लिपस्टिकचे रंग बदलू शकतात. त्यामुळे अशा वेळेस मार्केटमध्ये (Market) जाऊन लिपस्टिक खरेदी करणे चांगले.

3. ब्रश आणि हायलाईटर

तुमच्या त्वचेच्या टोन प्रमाणे योग्य ब्लश आणि हायलाईटर खरेदी करण्यासाठी ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन स्टोअर अधिक चांगले आहे.

C. ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

जर तुम्हाला मेकअप प्रॉडक्ट ऑनलाइन शॉपिंग स्टोर वरून खरेदी करायचे असेल तर अनेक ऑनलाइन स्टोअर उपलब्ध आहेत.  Nykaa, Myntra, Sugar, Filpkart, Purplle, Amazon हे मुख्य ऑनलाईन स्टोअर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT