Makeup Mistakes : 'या' 5 मेकअप मिस्टेक बनू शकतात स्किन इन्फेक्शनचे कारण, जाणून घ्या मेकअप हाईजीनबद्दल

Makeup Kit Mistakes :मेकअप तुम्हाला कायमचं सुंदर नाही बनवू शकत परंतु कॉन्फिडंट आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत करू शकतो.
Makeup Mistakes
Makeup Mistakes Saam Tv

Makeup Mistakes : एखाद्या पार्टीला जायचं असो किंवा एखाद्या डेटवर जायचे असो आपण मेकअप अवॉइड करू शकत नाही. मेकअप तुम्हाला कायमचं सुंदर नाही बनवू शकत परंतु कॉन्फिडंट आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत करू शकतो.

अशातच जेवढ्या गरजेचे मेकअपच्या स्टेप्स लक्षात ठेवणे असते. तेवढेच गरजेचे असते मेकअप हायजिनची काळजी घेणे. कारण की मेकअप करताना प्रॉडक्ट (Product) सरळ त्वचेच्या (Skin) संपर्कात येते.

अशातच तुम्ही हायजिनकडे लक्ष नाही दिलं तर, त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अशातच आज आम्ही तुम्हाला पाच अशा मेकअप पाहिजे सांगणार आहोत. ज्या मेकअप करताना तुम्हाला अवॉइड करायच्या नाही आहे.

Makeup Mistakes
Makeup Mistakes : सावधान ! मेकअप करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा त्वचेला सुटू शकते खाज

या पाच मेकअप हायजिन टिप्स लक्षात ठेवा -

1. मेकअप एप्लीकेटर्स क्लीन करा -

जर तुम्ही मेकअप ऍप्लिकेटर्स न धुता वारंवार वापरत असाल, तर याचा सरळ परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मिओलॉजीच्यानुसार मेकअप ऍप्लिकेटर क्लीन केल्याने फक्त बॅक्टेरिया आणि किटाणूनपासून बचाव केला जाऊ शकतो.

सोबतच मेकअपचे डाग, डेड स्किन सेल्सला सुद्धा अवॉइड केले जाऊ शकते. जे अनेक स्किन इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचे कारण बनू शकते. म्हणून तुमचे मेकअप टूल्स स्वच्छ करत राहा.

2. प्रॉडक्टच्या एक्सपायरी डेट कडे लक्ष द्या -

बऱ्याचदा आपण मेकअप प्रॉडक्टची एक्सस्पायरी डेट कडे लक्ष देत नाही. ज्यामुळे मेकअप केल्यानंतर खाज येणे, रेशेस होणे, फेडनेस आणि इन्फेक्शनचा खतरा वाढतो. यामुळे कोणतेही प्रॉडक्ट वापरण्याआधी एक्सपायरी डेट चेक करा.

खास करून आई मेकअप करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. कारण की नाजूक डोळ्यांवर एक्सपायरी डेट निघून गेलेल्या प्रोडक्टचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

3. मेकप एप्लीकेटर क्लीन करण्याची पद्धत -

मेकअप ऍप्लिकेटर्स योग्य वेळी क्लीन करण्यासोबत चांगल्या प्रकारे क्लीन करणे अत्यंत गरजेचे असते. बऱ्याचदा लोक हातांच्या मदतीने मेकप एप्लीकेटर्स क्लीन करतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मिऑलॉजीनुसार या स्टेपमुळे हातांवरील किटाणू सुद्धा एप्लीकेटर्स वरती येतात.

त्यामुळे स्कीम प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्यामुळे नेहमी टिशू नाहीतर कॉटनच्या सहाय्याने मेकअप टूल्स क्लीन करा. त्याचबरोबर मेकअप एप्लीकेटर्सला डीपली क्लिन करायचे असेल तर, गरम पाण्याचा वापर करा.

Makeup Mistakes
Harmful Makeup Products : सावधान! सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतायं, तुमच्या प्रॉडक्टमध्ये असू शकतात हे घातक पदार्थ

4. सनस्क्रीन अवॉइड करा -

जर तुम्ही दिवसा मेकअप करत असाल तर, तर तुम्ही सनस्क्रीन वापरणे विसरू नका. कारण की सनस्क्रिन तुमच्या मेकअप बेसला स्टेबल ठेवण्यासोबत तुमच्या त्वचेला केमिकल प्रॉडक्ट पासून वाचवते. सनस्क्रीनची एक हेवी लेयर लावल्याने मेकअप प्रॉडक्ट तुमच्या स्किन सेल्सच्या संपर्कात येणार नाही.

5. मेकअप रिमूव्ह केल्याशिवाय झोपू नका -

मेकअप लावून रात्रभर झोपने हे स्किन प्रॉब्लेम्सला आमंत्रण देण्यासारखे आहे. रात्रीच्या वेळी तुमची त्वचा हील करत असते. अशातच मेकअप स्किन हीलिंगला नॅचरल प्रोसेस करताना थांबवू शकते.

अशातच प्रॉडक्ट्स मधून केमिकल्स बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन होन्याचे कारण सुद्धा बनू शकते. म्हणूनच रात्री झोपायच्या आधी मेकअप रिमूव करून झोपा. त्याचबरोबर स्किनला डीपली मॉइश्चराइज करून झोपा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com