Budhwar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Budhwar che Upay: बिझनेसमधील समस्या पटकन सुटतील, बुधवारी हे उपाय करा, गणपती बाप्पा देईल आशीर्वाद

Business problems remedies Wednesday: ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट ग्रह स्वामी असतो आणि त्या दिवशी विशिष्ट देवांची पूजा केल्याने किंवा काही उपाय केल्याने शुभ फळे मिळतात.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं एक विशेष धार्मिक महत्त्व असतं. यामध्ये बुधवार हा गणपती बाप्पाचा यांचा दिवस मानला जातो. गणपती बुद्धीचे, व्यापाराचे आणि अडथळे दूर करणारे देव म्हणून ओळखले जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाचं नियंत्रण बुधवारी अधिक प्रभावी असतं. बुधवारच्या या दिवशी गणपतीची उपासना केल्यास बुध ग्रहाशी संबंधित अडचणी कमी होतात. त्याचप्रमाणे नशिबात बदल, आर्थिक प्रगती आणि सौभाग्य लाभतं. बुधवारच्या दिवशी तुम्ही कोणते उपाय करू शकता ते पाहा.

बुधवारच्या दिवशी करा हे उपाय

ऊसाच्या रसाचं अभिषेक करा

जर तुम्ही आर्थिक अडचणींमध्ये सापडले असाल तर तर बुधवारी गणपती बाप्पावर गोड ऊसाचा रस अर्पण करा. असं मानलं जातं की, हे केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि घरातील पैशांशी संबंधित समस्या दूर होतात.

पान आणि शमीपत्र अर्पण करा

पूजेदरम्यान गणपतीला ताजं पान आणि शमीचे पान अर्पण करा. यावेळी सोबत वक्रतुण्ड महाकाय..." ह्या मंत्राचा जप करा. या उपायामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि कामात यश लाभतं.

वास्तुदोषापासून सुटका

जर घरामध्ये वास्तु दोष असेल, तर बुधवारी श्रीकृष्णाला बासरी अर्पण करा आणि ही बासरी नंतर उत्तर दिशेला ठेवा. असं केल्याने घरात शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि समाधान टिकून राहतं.

मोदक आणि दूर्वा अर्पण करा

गणपतीला मोदक आणि ११ किंवा २१ दूर्वा अर्पण करा. हा उपाय केल्याने व्यवसायात लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि घरात लक्ष्मीचं आगमन होतं, असं मानलं जातं.

हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा

जर कुंडलीत बुध ग्रहाचा वाईट प्रभाव असेल तर तर बुधवारी हिरव्या फळांचं, भाज्यांचं, गहू, तांदूळ, बाजरी यांचं दान करा. ह्यामुळे बुध ग्रह प्रसन्न होतो. त्याचप्रमाणे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT