Lakshmi Narayan Yog Saam tv
लाईफस्टाईल

Lakshmi Narayan Yog: लक्ष्मी नारायण योग! या राशी होतील मालामाल, आरोग्याची काळजी घ्या

Shukra Budh Yuti In Sinh Rashi : ग्रहांच्या संक्रमणामुळे सर्व राशींच्या जीवनावर परिणाम दिसून येतो.

कोमल दामुद्रे

Shukra Budha Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अनेक वेळा संक्रमण होते, त्यानंतर त्या राशीत दुसरा ग्रह आल्याने दोन्ही ग्रहांचे संयोग होऊन शुभ-अशुभ योग तयार होतात. ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण झाले आहे.

ग्रहांच्या संक्रमणामुळे सर्व राशींच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. धन व भौतिक सुख देणारा शुक्राने ७ ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश केला आहे. शुक्र व बुध दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे या राशीत लक्ष्मी-नारायण योग तयार होत आहे. या योगाची निर्मिती सर्व राशीच्या लोकांच्या आयुष्यात दिसेल. परंतु 3 राशीच्या लोकांसाठी ते खूप शुभ आणि फलदायी असेल. चला जाणून घेऊया या 3 भाग्यशाली राशींबद्दल.

1. सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी यावेळी लक्ष्मी नारायण राजयोग आर्थिकदृष्ट्या (Money) शुभ सिद्ध होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. यावेळी व्यक्तिमत्व सुधारेल. जोडीदारासोबतचे (Partner) संबंध खूप चांगले राहतील. या काळात उत्पन्नातही वाढ होऊ शकते.

2. वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर (Benefits) ठरेल. या राशीच्या कर्म अर्थाने हा योग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळतील. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार करू शकाल. त्याचबरोबर वडिलांचे सहकार्यही मिळेल.

3. धनु

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने तयार होणारा लक्ष्मी नारायण योग धनु राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल. तुमच्या राशीच्या भाग्यशाली स्थानावर हा योग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ योग्य आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

Sleeping: गरजेपेक्षा जास्त झोपण्याचा आरोग्यावर होतो परिणाम, होतील 'हे' गंभीर आजार

Paid Menstrual Leave: सरकारीच नव्हे, खासगी क्षेत्रातही महिलांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी

SCROLL FOR NEXT