BSNL Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

BSNL Recharge Plan : सगळ्यात स्वस्त रिचार्ज! 22 रुपयांत 3 महिन्यांची सुविधा, पाहा काय आहे प्लान

22 Rupees Recharge Plan By BSNL : सिम सक्रिय ठेवण्याचा प्लान शोधत असाल तर बीएसएनएलचा हा प्लान तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

Shraddha Thik

Recharge Plan :

गेल्या काही वर्षात रिचार्ज प्लान महाग झाले आहेत. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लान महाग केले आहेत. दर महिन्याला रिचार्ज केले नाही तर सिमवरील इनकमिंग आणि आउटगोइंग सुविधा बंद होतात. अशा स्थितीत दोन सिमकार्ड (Simcard) असलेल्या लोकांची अडचण होत आहे.

तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असल्यास आणि स्वस्त रिचार्ज प्लान शोधत असाल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला प्लान आहे. हा रिचार्ज प्लान (Plan) सगळ्यात स्वस्त आहे आणि त्याची वैधताही अधीक आहे. या रिचार्ज अंतर्गत तुम्ही कॉलिंगची सुविधा घेऊ शकता.

22 रुपयांची 90 दिवसांची वैधता

BSNLने 22 रुपयांचा हा रिचार्ज प्लान 90 दिवसांच्या म्हणजेच तीन महिन्यांच्या वैधतेसह येतो. या अंतर्गत, तुम्हाला कॉल (Call) करण्याची सुविधा दिली जाते आणि तुमचे सिम तीन महिने सक्रिय राहील. याअंतर्गत एसटीडी आणि लोकल कॉलिंगची सुविधा 30 पैसे प्रति मिनिट या दराने उपलब्ध असेल, मात्र मोफत इंटरनेट आणि मोफत कॉलिंग, एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

काय फायदे समाविष्ट आहेत

जर तुम्हाला BSNL च्या 22 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, त्याची वैधता 90 दिवसांसाठी म्हणजेच 3 महिन्यांसाठी ऑफर केली जात आहे. महागड्या प्लानमध्ये सुद्धा 90 दिवसांची वैधता क्वचितच दिली जाते, परंतु या 22 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण 90 दिवसांची वैधता ऑफर केली जाते.

तुम्हालाही तुमचे पैसे वाचवायचे असतील तर हा रिचार्ज प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT