Brothers Day Gift Saam TV
लाईफस्टाईल

International Brothers Day: यंदाच्या बदर्स डेनिमित्त भावाला द्या हे गिफ्ट; भाऊ होईल खूश

Gift Ideas for Brother: दरवर्षी संपूर्ण जगभरात १४ मे रोजी आंतरराष्ट्रीय ब्रदर्स डे साजरा केला जातो. बहिण भांवडांमधील प्रेम वाढण्यासाठी, त्यांचे नाते अजूनच घट्ट होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरवर्षी संपूर्ण जगभरात १४ मे रोजी आंतरराष्ट्रीय ब्रदर्स डे साजरा केला जातो. बहिण भांवडांमधील प्रेम वाढण्यासाठी, त्यांचे नाते अजूनच घट्ट होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी या युरोपीय देशांमध्ये ब्रदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. बहिण भावांमधील प्रेम कायम राहावे यासाठी हा दिवस साजरा करतात.

बहिण भावांमध्ये नेहमी मस्ती, भांडणे हे होतच असतात. याच भांडणात त्यांच्या नात्याची खरी मज्जा असते. प्रत्येक बहिण आपल्या भावाची आणि प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची कळत नकळत सर्वाधिक काळजी घेत असतात. प्रत्येक सुख- दुःखाच्या प्रसंगी आपण सर्वात आधी भावंडाची आठवण काढतो. त्यामुळेच आजचा दिवस ब्रदर्स डे म्हणून साजरा केला जातो. या ब्रदर्स डेनिमित्त तुम्ही तुमच्या भावाला वेगवेगळे गिफ्ट्स देऊ शकतात.

इअरबड्स

तुम्ही तुमच्या भावाला इअरबड्स गिफ्ट करु शकतात. तुमच्या भावाला चित्रपट पाहण्याचा किंवा गाणी ऐकणाची शौक असेल तर इअरबड्स हा बेस्ट पर्याय आहे.

टी-शर्ट

तुम्ही तुमच्या भावाला टी- शर्ट गिफ्ट करु शकतात. त्याच्या आवडीच्या रंगाचं शर्ट देऊ शकतात. तसेच तुम्ही कस्टमाइज टी-शर्टवर भावासाठी काहीतरी लिहून आपला मेसेज त्याच्यापर्यंत पोहचवू शकतात.

स्मार्ट वॉच

सध्याच्या काळात स्मार्ट वॉचचा ट्रेंड आहे. स्मार्ट वॉच हे कोणत्या लूकवर मॅचिंग होते. यामध्ये तुम्ही कॉल, मेसेज करु शकतात. किंवा तुम्हाला तुमच्या फिटनेसची सर्व माहिती स्मार्ट वॉचवर मिळते. त्यामुळे तुम्ही स्मार्ट वॉच गिफ्ट देऊ शकतात.

बॅग

जर तुमचा भाऊ लहान असेल किंवा ऑफिसला जात असेल तर तुम्ही त्याला बॅग गिफ्ट देऊ शकता. लहान भावाला शाळेसाठी बॅग गिफ्ट देऊ शकतात. ऑफिसला जाणाऱ्या भावासाठी लॅपटॉप बॅग देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे व्होट जिहाद करतायेत - आशिष शेलार

Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश

सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा? नुकसान भरपाई म्हणून २ रूपये ३० पैसे बँक खात्यात जमा; बळीराजा नाराज

Mushroom Soup Recipe: हिवाळ्यात प्या मस्त गरमा गरम मशरूम सूप, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

CIDCO Homes : दोन लाखांनी घरे स्वस्त होणार, निवडणुकीआधी सरकार घेणार मोठा निर्णय? सिडकोची आज महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT