Gift Ideas For Children
Gift Ideas For ChildrenSaam TV

Gift Ideas For Children: चिमुकल्यांना द्या नवीन वर्षासाठी 'या' खास भेट वस्तू; पाहा बेस्ट गिफ्ट ऑप्शन्सची यादी

Gift Ideas: आता नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्या चिमुकल्यांना काय गिफ्ट द्यावं याबाबत तुमच्याही मनात गोंधळ असेल. नेमकं काय घ्यावं हे समजत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही गिफ्ट आयडीया आणल्या आहेत.
Published on

Gift Ideas:

नव वर्षाला सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षानिमित्त तुम्ही प्रत्येक व्यक्तीला गिफ्ट देण्याचा प्लान केला असेल. आपल्याला काय गिफ्ट मिळणार याबाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. अशात लहान मुलांच्या मनात तर गिफ्ट म्हटलं की भलताच उत्साह असतो.

Gift Ideas For Children
Diwali Gift Ideas : प्रत्येक दिवाळीला सोनपापडीच का? त्याच बजेटमध्ये या भेटवस्तू ठरतील एकदम बेस्ट

लहान मुलांना गिफ्ट खरेदी करून देणं म्हणजे थोडी कठीण गोष्ट आहे. कारण लहान मुलं अगदी लहान सहान गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवतात. आता नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्या चिमुकल्यांना काय गिफ्ट द्यावं याबाबत तुमच्याही मनात गोंधळ असेल. नेमकं काय घ्यावं हे समजत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही गिफ्ट आयडीया आणल्या आहेत.

पुस्तकं

लहान मुलांना पुस्तकं तशी आवडत नाहीत. तुमच्या मुलांनाही अभ्यासाचा कंटाळा असेल तर तुम्ही त्यांना गोष्टींची पुस्तकं देऊ शकता. यामध्ये तुम्ही कॉमिक बुक्स देखील देऊ शकता. याने तुमच्या मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल.

आर्ट अँड क्राफ्ट

जर तुमची मुलं आधीपासूनच अभ्यासू असतील तर त्यांना थोडं वेगळं गिफ्ट द्या. यासाठी तुम्ही त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा यासाठी आर्ट अँड क्राफ्ट किट गिफ्ट करू शकता. प्रत्येक मुलाच्या वयानुसार मार्केटमध्ये कलर आणि डिझाइन क्राफ्ट उपलब्ध आहेत.

संगित वाद्य

मुलांना इतर अॅक्टीवीटी देखील याव्यात यासाठी तुम्ही त्यांना संगितातील एखादं वाद्य गिफ्ट करू शकता. यामध्ये गिटार, पियानो किंवा बासरी सारखी वाद्य देऊ शकता.

आउटडोअर गेम कीट

तुमच्या मुलीची आवड लक्षात घेऊन तुम्ही त्यानुसार देखील गिफ्ट देऊ शकता. यामध्ये तुम्ही मैदानी खेळातील साहित्यातील क्रिकेट किट, बॅटमिंटन किट देऊ शकता.

लहाना मुलांना असे गिफ्ट दिल्याने याचा त्यांना फायदा होईल. तसेच त्यांचा सर्वांगीन विकास होण्यामध्येही मदत होईल. दिलेले हे गिफ्ट्स तुमच्या लहान मुलांना देखील फार आवडतील.

Gift Ideas For Children
Uttar Pradesh Crime News: मोबाईलसाठी बायकोने नवऱ्याचा डोळाच फोडला; उत्तर प्रदेशातील घटनेने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com