उन्हाळ्यात उकाड्यामुळे प्रचंड घाम येतो. त्यामुळे केसांही तेलकट होतात. केसांना घाम आल्याने घाणेरडा वास येतो, त्याचसोबत केसपण चिकट होतात. चिकट केस घेऊन ऑफिसमध्ये, शाळेत जायला खूप लाज वाटते. याचसोबत केस चिकट राहिल्यावे केस गळती, टक्कल पडणे अशा समस्या होतात. चिकट केसांमुळे आपल्याला खूप अस्वस्थ वाटते. त्यामुळे केस योग्य पद्धतीने धुणे आवश्यक आहे. केस जर तुम्ही नीट धुतले तर ते चिकट होणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला केस धुण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
केस धुतल्यानंतर दोन-तीन दिवसांवी चिकट दिसू लागतात. त्यामुळे वेगवेगळ्या हेअरस्टाईल करणे खूप अवघड होते. शॅम्पू आणि कंडिशनर योग्य पद्धतीने न लावल्याने केस चिकट होतात. त्यामुळे या टीप्सचा वापर करुन केस धुवा.
केस धुण्याची योग्य पद्धत
केस धुताना अनेक लोक नीट शॅम्पू लावत नाही. त्यामुळे केस चिकट होतात. अनेकदा लोक केसांच्या फक्त वरच्या बाजूला शॅम्पू लावतात. यामुळे केसांचा वरचा भाग स्वच्छ होतो. परंतु इतर भागांवर शॅम्पू लागतच नाही. तुम्ही केस धुताना नेहमी थोडं पाणी घेऊन त्यात शॅम्पू टाका. त्यानंतर तो शॅम्पी केसांच्या सर्व भागावर लावा. यानंतर केस धुवा.
कंडिशनर कसा लावायचा
कंडिशनर लावताना अनेकदा लोक केसांच्या वरच्या भागावर लावतात. कंडिशनर हा नेहमी खालच्या बाजूच्या केसांना लावायचा असतो. त्यामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. केसांच्या वरच्या भागावर कंडिशनर लावल्याने केस गळतात.
तेल
केस धुताना शॅम्पू लावावा. शॅम्पू लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. अनेकदा केस धुताना केसातील तेल निघत नाही. यामुळे केस खराब होतात आणि गळतात. त्यामुळे केस धुताना सर्व बाजूंवर शॅम्पू लावावा. त्यानंतर मालिश करुन केस पाण्याने धुवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.