वर्षभर पैशांचा पाऊस होईल
वर्षभर पैशांचा पाऊस होईल Saam Tv
लाईफस्टाईल

Money Tips | 2022 मध्ये घरी 'या' गोष्टी आणा, वर्षभर पैशांचा पाऊस होईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 2021 हे वर्ष संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही कोरोनामुळे (Corona) लोकांचे ओतोनात नुकसान झाले. निर्बंध जरी शिथील झाले असले तरीही ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं करणे, नव्याने उद्योग धंदे सुरु करणे, नोकऱ्या शोधणं हे आव्हानात्मक होऊन बसलं आहे. येणारं वर्ष हे समृद्धीचं असू देत असंच मागणं सध्या देवाकडे आहे. येणाऱ्या 2022 मध्ये जर तुम्हीही श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहात असाल तर यापैकी एखादी वस्तू घरी नक्की आणा. (Bring These Things To Home In New Year 2022 For Wealth)

मोरपीस -

मोरपीस हे दिसायला अत्यंत सुंदर असते. हे कृष्णालाही प्रिय असते, म्हणूनच कृष्ण (Krishna) त्याला डोक्यावर धारण करतो. हिंदू धर्मातच नाही तर ज्‍योतिषशास्त्रातही मोरपीसला अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. मोरपीस घरात ठेवल्याने नशिब उजळते. नवीन वर्षात (New Year) एक किंवा तीन मोरपीस घरी आणल्याने तुमच्यावर वर्षभर पैशांचा (Money) पाऊस होईल.

हेही वाचा -

सूर्योदयाचं चित्र -

सूर्योदयाचं चित्र वास्‍तूशास्‍त्रात अत्यंत शुभ आणि सकारात्‍मक मानलं जातं. हे चित्र घरात लावल्याने भिंतीचं सौंदर्य तर वाढतंच त्याशिवाय घरात समृद्धीही येते.

चांदीचा हत्ती -

हत्ती स्वप्नात दिसणे अत्यंत शुभ संकेत मानलं जाते. तर घरात चांदीचा हत्ती ठेवल्याने तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहाते. यामुळे धनप्राप्तीचे योग येतात.

शमीचं झाड -

शमीचं झाड एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे समृद्धीला आपल्याकडे आकर्षित करतो. ज्या घरात शमीचं झा़ड असते तिथे कुठल्याही प्रकारे पैशांची चूणचूण भासत नाही. नव्या वर्षात घरी शमीचं झाड लावल्याने तुम्हाल कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. हे झाड अनेक प्रकारचे वास्तू दोष आणि शनि दोष दूर करतो.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

SCROLL FOR NEXT