लाईफस्टाईल

Heart Health : हार्ट पेशंटसाठी खूशखबर; हृदयविकारावर क्रांतीकारी उपचार सापडला, VIDEO

हृदयरोगग्रस्तांना पेसमेकर म्हणजे नवसंजिवनी असते. आगपेटी इतका पेसमेकर आजपर्यंत हदयरोगींसाठी वापरला जात होता. परंतू आता नव्यानं आलेल्या पेसमेकरनं हदयरोगग्रस्तांना मोठा दिलासा मिळणारेय. हा नवा पेसमेकर कसाय पाहूया..

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

हृदयविकारांनं चिंताग्रस्त आहात का? तर काळजी करु नका...तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. दरवर्षी लाखो लोकांचा हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होतो. हदयविकाराचा झटका येणं, हृदयाची अनियमितता यांसारख्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतेय. मात्र आता हदयविकारांवर चुटकीसरशी उपचार करता येणं शक्य होणार आहे. चक्क तांदळाच्या दाण्याएवढा पेसमेकर हदयविकारांची समस्या क्षणार्धात सोडवणार आहे. हा पेसमेकर हदयविकारांची समस्या कशी सोडवणार? पाहूयात...

हृदयविकारांचा क्षणार्धात उपचार

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील तज्ज्ञांकडून पेसमेकर विकसित

पेसमेकरचा आकार तांदळाच्या दाण्याऐवढा

शस्त्रक्रियेशिवाय सहजपणे शरीरात इंजेक्ट करता येणार

जन्मजात हृदयदोषग्रस्त नवजात बालकांसाठी उपयुक्त

हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर

पेसमेकरद्वारे हृदयाचे ठोके नियंत्रित करता येणार

5 ते 7 आठवड्यांत पेसमेकर शरीरात पूर्णपणे विरघळणार

पेसमेकर काढण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज नाही

विशेष म्हणजे, या लहान पेसमेकरला बॅटरीनं नाही तर शरीरातील द्रवपदार्थांच्या माध्यामातून ऊर्जा मिळते. त्यामुळे हृदयरोगतज्ज्ञांनीही याबद्दल सकारात्मकता दर्शवलीय. हृदयरोग असणाऱ्यांना नवसंजीवनी देणारा हा पेसमेकर वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती निर्माण करणारा आहे. या शोधामुळे रुग्णांचे उपचार अधिक सुरक्षित आणि सुलभ होतील. आता या पेसमेकरचा सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी वापर कधी केला जाईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT