Breakfast Recipes Saam TV
लाईफस्टाईल

Breakfast Recipes : सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत झटपट होणारा नाश्ता; 5 हेल्दी रेसिपी

Ruchika Jadhav

मुंबईमध्ये सकाळच्यावेळी सर्वांचीच फार घाई असते. शाळेत जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी सर्वजण घराबाहेर पडतात. घराबाहेर पडण्याआधी आपलं पोट भरलेलं असणं गरजेचं असतं. याची पूर्ण जबाबदारी घरातील मुख्य महिलेवर असते. आता ऐवढ्या धावपळीत सहज आणि पटकन तयार होणारा नाश्ता बनवण्याचा महिलांचा प्रयत्न असतो. त्यामुळे आज अशाच काही हेल्दी आणि सोप्प्या रेसिपी जाणून घेऊ.

गव्हाचा दलिया किंवा लापशी

बाजारात गव्हाचे लहान तुकडे असलेला दलिया म्हणजेच लापशी मिळते. ही लापशी गोड स्वरूपात तुम्ही सर्वांनी खाल्ली असेल. मात्र सकाळी गोड कुणालाही नको असतं. तिखट नाश्ता हवा असेल तर दलिया भाजून ५ मिनिटे पाण्यात भीजत ठेवा. त्यानंतर तेलात जिरे मोहरीची फोडणी टाका आणि कांदा चांगला परतून घ्या. त्यानंतर गव्हाचा दलिया त्यामध्ये अॅड करा. पुढे तुमच्या चवीनुसार त्यात तिखट, मिठ मिक्स करा.

हिरव्या मुगाचे डोसे

आदल्या दिवशी सकाळी थोडे मुग पाण्यात भीजत ठेवा. रात्री झोपण्याआधी त्यामध्ये लसूण, मिरची आणि आलं टाकून मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर सकाळी उठल्यावर त्याचे मस्त डोसे बनवा.

रव्याचा ढोकळा

बेसन पीठाचा ढोकळा तुम्ही आजवर अनेकदा खाल्ला असेल. मात्र रव्यापासून देखील ढोकळा बनवता येतो. त्यासाठी रव्यामध्ये दही अॅड करा. त्यात थोडं आलं, मिरची, सोडा आणि मीठ मिक्स करा. हे सर्व मिश्रण ५ मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर मस्त ढोकळा पॅनवर बॅटर टाकून वाफवून घ्या. त्यावर नंतर साखर, जीरे, मोहरीची फोडणी टाकून तयार झाला तुमचा रव्याचा ढोकळा.

मिक्स पिठांचं थालिपीठ

झटपट नाश्त्यासाठी घरी मिक्स पीठांचा डब्बा भरून ठेवा. जेव्हा वेळ नसेल तेव्हा यातील एक वाटी पिठ, त्यात तिखट, मिठ आणि आवडीच्या भाज्या मिक्स करून कनीक मळा. त्यानतंर त्याचे थालिपीठ करून तव्यावर लो टू मिडिअम फ्लेमवर भाजून घ्या.

तिखट शेवया

सध्या उन्हाळा सुरू आहे. तर तुम्ही देखील घरगुती शेवया बनवून घ्या. या शेवया फक्त पाण्यात उकळवून त्यात साखर आणि दूध टाकून तुम्ही खाऊ शकता. किंवा उपम्यासाठी जी सामग्री लागते त्याप्रमाणे तु्म्ही तिखट शेवया बनवू शकात.

झटपट कमी वेळात तयार होणाऱ्या या रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT