ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्वारीचे पीठ, बेसन, हळद पावडर, मिरची पावडर, कांदा, गाजर, कोथिंबीर, मीठ, तेल, पाणी
एका मिक्सिंग बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर घ्या.
त्यानंतर त्यामध्ये ज्वारीचे पीठ बेसन, हळद पावडर आणि लाल मिरची पावडर मिक्स करा. सर्व मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चविनुसार मीठ घाला.
हे सर्व साहित्य एकत्र करूण त्यामध्ये आवश्यक प्रमाणात पाणी घाली.
हे मिश्रण बनवताना गुठळ्या होऊ नयेत याची दक्षता घ्या . पीठ डोस्याच्या पिठासारखे पातळ असावे.
त्यानंतर तवा गरम करून त्यामध्ये थोडं तेल गरम करा. त्यामध्ये हे पीठ गोल आकारात पसरवून घ्या. हे पॅन केक दोन्ही बाजूंनी खमंग हलके तपकिरी होईपर्यंत भाजा.
रेडी पॅन केक दही किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.