Brain Health  Saam Tv
लाईफस्टाईल

Brain Health : मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढतोय ब्रेन ट्यूमरचा धोका ? जाणून घ्या, याबाबतचे समज-गैरसमज

Side Effects Of Mobile On Brain Health: दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयींमुळे मेंदूला हानी होत आहे.

कोमल दामुद्रे

Brain Tumor Symptoms : मेंदू हा आपल्या शरीराचा मुख्य अवयव मानला जातो. आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांचे कार्य सुरळीत करण्याचे काम हे मेंदूपासून होते. मेंदूला चालना मिळाल्यानंतरच आपल्या शरीराच्या इतर हालचाली सुरु होतात. पंरतु, दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयींमुळे मेंदूला हानी होत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेंदूशी संबंधित आजाराची सर्वाधिक चर्चा ब्रेन ट्यूमर आहे. बहुतेक लोकांना या आजाराबद्दल योग्य माहिती नसली तरी. सध्या स्मार्टफोन हा अनेकांचा सोबती झाला आहे. जितका याचा आपल्याला फायदा आहे तितकाच तोटा. तर चुकीची माहिती रोगाचे वेळेवर निदान आणि उपचारात अडथळा आणू शकते. ब्रेन ट्यूमरशी संबंधित अशाच काही अफवांबद्दल जाणून घेऊया.

1. मोबाईल फोनमुळे ब्रेन ट्युमरचा धोका वाढत आहे ?

मोबाईलच्या (Mobile) अतिवापरामुळे अनेक प्रकारचे आजार (Disease) वाढतात असे मानले जाते. अनेकांना असे वाटते की, मोबाइल फोनमुळे ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो. परंतु, अद्यापह याबाबत कोणताही पुरावा समोर आलेला नाही. दीर्घकाळ रेडिएशनच्या संपर्कात राहिल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

2. जर पालकांपैकी एकाला ब्रेन ट्यूमर झाला असेल, तर मुलांनाही धोका असतो

मधुमेह (Diabetes) आणि हृदयविकार यासारख्या समस्यांप्रमाणेच, ब्रेन ट्यूमरच्या अनुवांशिक जोखमींबद्दल अनेकदा भीती व्यक्त केली जाते. याबाबतीतही सध्या कोणतेही पुरावे डॉक्टरांनी दिलेले नाही. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की विविध प्रकारचे पर्यावरणीय किंवा जीवनशैलीचे घटक ब्रेन ट्यूमरचे मुख्य कारण आहेत. तो पालकांकडून मुलाकडे जातो. परंतु, हा आजार अनुवांशिक नाही.

3. ६० वर्षांवरील लोकांनाच ब्रेन ट्युमर होतो ?

जर तुम्हाला वाटत असेल की ब्रेन ट्यूमरची समस्या फक्त वृद्ध लोकांसाठी आहे, तर ही चुकीची माहिती तुम्हाला गोंधळात टाकू शकते. ब्रेन ट्यूमर हा एक आजार आहे जो मुले आणि प्रौढ दोघांनाही होऊ शकतो. सर्व निदान झालेल्या ब्रेन ट्यूमर प्रकरणांपैकी सुमारे 3.9 टक्के 0-14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळतात. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांनी ब्रेन ट्यूमरची लक्षणे समजून घेणे आणि लवकरात लवकर उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

4. ब्रेन ट्यूमर म्हणजे कर्करोग ?

बर्‍याच लोकांना असे वाटते की, ब्रेन ट्यूमर हा कर्करोगच आहेत, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. ब्रेन ट्यूमर कर्करोग नाही. याव्यतिरिक्त, ब्रेन ट्यूमरपैकी फक्त एक तृतीयांश लोकांना कॅन्सर होऊ शकतो. वेळेवर निदान झाल्यास मेंदूतील गाठी योग्य उपचाराने बरे होऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT