Brain Tumor Warning Signs google
लाईफस्टाईल

Brain Cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापुर्वी डोकंच नाही तर ही गंभीर लक्षणं दिसतात, या समस्यांना दुर्लक्षित करणं आत्ताच टाळा

Brain Tumor Warning Signs: साधी वाटणारी डोकेदुखी कधी कधी मेंदूच्या कॅन्सरची सुरुवात असू शकते. दृष्टी बदल, झटके, वर्तनातील बदल दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सध्याचा कामाचा ताण तरुणांपासून वृद्धांपर्यंत वाढत चालला आहे. ताण वाढला की हमखास डोकेदुखी वाढते आणि याचं रुपांतर मोठ्या जीवघेण्या आजारामध्ये होतं. डोकंदुखी ही बऱ्याचदा साधी आणि तात्पुरती समस्या आपण समजतो. मात्र काही वेळा मेंदूतल्या गाठी किंवा ट्यूमरची सुरुवात सामान्य डोकंदुखीसारखीच वाटते. यामध्ये अचानक नवीन प्रकारची डोकेदुखी सुरू होते, ती वारंवार होत असते, हळूहळू जास्त वेदना होतात किंवा नेहमीच्या औषधांनी कमी होत नाहीत. अशा बदलांसोबत काही न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसत असतील, तर तातडीने तपासणी करणं आवश्यक ठरतं.

डोकेदुखीशिवायही मेंदूच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात. उदाहरणार्थ, डोळ्यात बदल जाणवणं हे एक महत्त्वाचं संकेत असू शकतं. धूसर दिसणं, दुहेरी दिसणं, प्रकाशाची तीव्र संवेदनशीलता किंवा काही क्षणांसाठी दृष्टी कमी होणं विशेषतः ही लक्षणे नवीन असतील किंवा वाढत असतील तर मेंदूतली गाठ ऑप्टिक नर्व्ह किंवा दृष्टी नियंत्रित करणाऱ्या भागांवर दबाव टाकत असल्याचे संकेत असू शकतात.

अचानक आलेला पहिला झटका (सीझर) हा नेहमीच गंभीर मानला जातो. मेंदूतील ट्यूमरमुळे विद्युत संकेतांमध्ये बिघाड होऊन झटके येतात. काही वेळा पूर्ण झटका न येता हात-पायाला आकडी येते, काही बोलता येत नाही , किंवा गोंधळल्यासारखं वाटतं अशीही लक्षणे दिसू शकतात. अशा कोणत्याही पहिल्या झटक्याची तातडीने वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे.

हळूहळू होणारे वर्तनातील आणि विचारांतील बदल अनेकदा कुटुंबीयांच्या लक्षात येतात. स्मरणशक्ती कमी होते, निर्णय घेण्यात अडचण येते, चिडचिड वाढते, नैराश्य, चिंता किंवा गोंधळल्यासारखे वाटते ही लक्षणे मेंदूच्या फ्रंटल लोब किंवा इतर भागांवर परिणाम झाल्याचे दर्शवू शकतात.

चालण्यात अडचण येणे, अचानक तोल जाणे, वारंवार अडखळणे, चक्कर येणे, हातांच्या हालचाली नीट न होणे किंवा कामे करताना अडचण येणे ही लक्षणे मेंदूच्या सेरेबेलम किंवा हालचाली नियंत्रित करणाऱ्या भागांवर दबाव आल्याचे संकेत असू शकतात.

यासोबतच शरीराच्या एका बाजूला सुन्नपणा, अशक्तपणा किंवा ताकद कमी झाल्यास तातडीने तपासणी आवश्यक ठरते. तज्ज्ञांच्या मते, ही लक्षणे अनेक इतर कारणांमुळेही दिसू शकतात, पण ती नवीन असतील, वाढत असतील किंवा एकत्र दिसत असतील, तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास उपचार जास्त प्रभावी असू शकतात.

टीप: हा मजकूर केवळ सामान्य माहिती व जनजागृतीसाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

SCROLL FOR NEXT