Sakshi Sunil Jadhav
थंडी सुरु झाली की स्वेटर, जॅकेट, शाल यांसारखे उबदार कपडे वापरला सुरुवात होते. मात्र, योग्य काळजी न घेतल्याने या कपड्यांवर लगेच मळ आणि डाग साचतात. त्यामुळे जाणून सोप्या आणि प्रभावी टिप्स लगेचच फॉलो करा.
स्वेटर हलक्या पद्धतीनं स्वच्छ केल्याने मळ खोलवर बसत नाही आणि कपडे लवकर स्वच्छ होतात.
उबदार कपडे सतत धुतल्यावर त्यांचा आकार बिघडतो आणि कापड कमकुवत होते. कपडे फाटूही शकतात.
योग्य ट्रिक वापरल्यास फक्त १० मिनिटांत स्वेटर किंवा जॅकेटवरील घाण निघून जाते. या सोप्या पद्धतीमुळे कपडे धुताना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत.
स्वेटर किंवा जॅकेट महागडे असतील तर ड्राय क्लिनिंग हा सुरक्षित पर्याय ठरतो.
जास्त वेळ भिजवल्यास कपड्यांची फिटिंग खराब होते आणि कमी टिकतात. ओलसर राहिल्यास उबदार कपड्यांना वास येऊ शकतो.
कपड्यांतील ओलावा काढण्यासाठी त्यांना उन्हात नीट वाळवा.
योग्य पद्धतीने वाळवल्यास कपडे ताजे राहतात आणि वापरासाठी सुरक्षित होतात.