Brain aneurysm saam tv
लाईफस्टाईल

Brain aneurysm: मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यास दिसतात 'ही' लक्षणं; आधुनिक पद्धतीने यावर कसे उपचार होतात? तज्ज्ञांनी माहिती

Brain aneurysm symptoms: ब्रेन ॲन्युरिझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनीच्या भिंतीत तयार झालेला एक कमकुवत भाग, जो फुगून फुग्यासारखा दिसतो. हा फुगवटा कधीकधी लहान वाटाण्याएवढा असतो, तर कधी मोठाही असू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • ब्रेन अ‍ॅन्युरिझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनीचे भिंती कमकुवत होऊन तिचे फुगणे, ज्यामुळे फुटल्यास रक्तस्रावाचा धोका असतो.

  • AVM ही जन्मजात स्थिती असून मेंदूतील रक्तवाहिन्यांचे अनियमित जाळे तयार होते, ज्यामुळे रक्तप्रवाह बिघडतो.

  • या आजारांची लक्षणे जसे की तीव्र डोकेदुखी, चक्कर, मळमळ, बोलण्यात अडचण यांकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन अ‍ॅन्युरिझम आणि AVM (अर्टेरिओव्हेनस मॅलफॉर्मेशन) हा गंभीर मेंदूविकार होता. ही माहिती त्याने पहिल्यांदाच सर्वांसमोर आणली असून वेळेत निदान झाल्यामुळे उपचारांमुळे त्याची तब्येत आता उत्तम आहे. यामुळे मेंदूच्या विकारांबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

मेंदूतील रक्तवाहिन्यांचे गंभीर विकार

नागपूरच्या अँजिओप्रो इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी क्लिनिकचे इंटरव्हेंशनल न्यूरोरेडिओलॉजिस्ट डॉ. दिनेश शर्मा म्हणाले की, ब्रेन अ‍ॅन्युरिझम आणि AVM हे दोन्ही आजार मेंदूतील रक्तवाहिन्यांशी संबंधित असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतात. ब्रेन अ‍ॅन्युरिझम म्हणजे मेंदूतील एखाद्या रक्तवाहिनीची भिंत कमकुवत होऊन ती फुगते. या फुगलेल्या भागाला 'अ‍ॅन्युरिझम' म्हटलं जातं. ती रक्तवाहिनी फुटल्यास तीव्र रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

दुसरीकडे AVM ही जन्मजात स्थिती असून यात मेंदूतील रक्तवाहिन्यांचे नैसर्गिक जाळं बिघडलेलं असतं. त्यामुळे रक्तप्रवाह अयोग्य मार्गाने होतो आणि यामुळे मेंदूत दाब वाढून रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो.

लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

अँजिओप्रो इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी क्लिनिकचे इंटरव्हेंशनल न्यूरोरेडिओलॉजिस्ट डॉ. अर्पित धकाते यांनी सांगितलं की, हे दोन्ही विकार अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं न देता शरीरात असतात. मात्र काही वेळा अचानक तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, मळमळ, दृष्टीबदल, बोलण्यातील अडचण किंवा एका बाजूच्या शरीरभागात अशक्तपणा जाणवू शकतो. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूपाचे अपघाती रक्तस्राव होऊन जीवाला धोका संभवतो.

सलमान खानचा अनुभव

सलमान खानच्या बाबतीत हे निदान वेळेवर झालं आणि त्याने तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेतले. सलमानने सांगितलं होतं की, "त्या काळात मला काहीच त्रास नव्हता, पण एक तपासणीत ही स्थिती आढळून आली आणि मी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला." त्याच्या अनुभवामुळे सामान्य नागरिकांनीही अशा विकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झालीये.

इंटरव्हेन्शनल न्यूरोरेडिओलॉजीद्वारे मेंदूच्या आजारांवरील आधुनिक उपचार

या क्षेत्रात इंटरव्हेन्शनल न्यूरोरेडिओलॉजिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या आजारांवर शस्त्रक्रियेविना किंवा अल्प शस्त्रक्रिया पद्धतीने उपचार करतात. डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफीद्वारे अचूक निदान करता येतं. त्यानंतर कोइलिंग, एंबोलायझेशन यांसारख्या पद्धती वापरून अ‍ॅन्युरिझम AVM वर उपचार केले जातात. यामुळे मेंदूतील रक्तस्राव रोखणं शक्य होतं.

काय खबरदारी घ्याल?

डोकेदुखी वारंवार होत असेल, चक्कर येणं यांसारखे त्रास जाणवत असतील तर त्वरित न्युरो स्पेशालिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कुटुंबात कोणी अशा आजाराने ग्रस्त असेल तर वेळोवेळी स्क्रिनिंग करून घ्यावं. वेळेवर निदान आणि उपचार या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत.

सलमान खानला कोणता मेंदूविकार झाला होता?

सलमान खानला ब्रेन अ‍ॅन्युरिझम आणि AVM (अर्टेरिओव्हेनस मॅलफॉर्मेशन) हे दोन गंभीर मेंदूविकार होते.

ब्रेन अ‍ॅन्युरिझम म्हणजे काय?

मेंदूतील रक्तवाहिनीची भिंत कमकुवत होऊन ती फुगणे म्हणजे ब्रेन अ‍ॅन्युरिझम , ज्यामुळे रक्तस्रावाचा धोका असतो.

AVM म्हणजे काय?

AVM म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांचे जन्मजात अनियमित जाळे , ज्यामुळे रक्तप्रवाह बिघडतो आणि रक्तस्रावाचा धोका वाढतो.

या आजारांची सुरुवातीची लक्षणे कोणती?

तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, दृष्टीत बदल, बोलण्यात अडचण किंवा एका बाजूचा अशक्तपणा ही या आजारांची लक्षणे आहेत.

मेंदूच्या या आजारांवर कशाप्रकारे उपचार केले जातात?

इंटरव्हेन्शनल न्यूरोरेडिओलॉजी द्वारे कोइलिंग आणि एंबोलायझेशन सारख्या किमान आक्रमक पद्धतींनी उपचार केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT