Omicron Varient: रिकव्हरीनंतर अशक्तपणा, वेदनेच्या तक्रारी - Saam Tv
लाईफस्टाईल

Omicron Varient: रिकव्हरीनंतर अशक्तपणा, वेदनेच्या तक्रारी

डिसेंबरच्या मध्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेमागे कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन असल्याचे सांगितले जात आहे. ओमिक्रॉनमुळे त्रस्त असलेले बहुतांश रुग्ण ३ ते ४ दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतर काहींना अशक्तपणा, अस्वस्थता, डोके व अंगदुखीच्या तक्रारी असल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले

साम टिव्ही

मुंबई : डिसेंबरच्या मध्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेमागे कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन असल्याचे सांगितले जात आहे. ओमिक्रॉनमुळे त्रस्त असलेले बहुतांश रुग्ण ३ ते ४ दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतर काहींना अशक्तपणा, अस्वस्थता, डोके व अंगदुखीच्या तक्रारी असल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले. (Body ache fatigue after omicron post recovery)

दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की याला पोस्ट-कोविड समस्या (Post Covid Symptoms) म्हणणे खूप घाईचे ठरेल, कारण हे लोक आताच बरे झाले आहेत. आता पुढील दोन-तीन आठवड्यांनंतरही या समस्या कायम राहतात का, हे पाहावे लागेल.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने खूप धुमाकूळ घातला. या आजारातून बरा होऊनही, अनेक रुग्ण कोविड नंतरच्या आरोग्याच्या समस्या जसे की निद्रानाश, न्यूरो-संबंधित समस्या, अस्वस्थता इत्यादी तक्रारी करत होते, ज्यामुळे लोकांना बराच काळ त्रास होत होता. ओमिक्रॉनचा (Omicron) त्रास झालेल्या लोकांनाही कोविड नंतरच्या समस्या असतील की नाही हे जाणून घेण्यासाठी शहरातील विविध डॉक्टरांशी बातचीत केली गेली.


महापालिकेच्या (BMC) सेव्हन हिल्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले की, तिसर्‍या लाटेत कोविडची लागण झालेले आणि त्यातुन बरे झालेल्या काही लोकांना थकलेले आणि अस्वस्थ वाटत आहेत. ही समस्या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही दिसून आली आहे. यापूर्वी, एखाद्याला संसर्ग झाल्यास, किमान १० ते १४ दिवस अलगीकरणात ठेवले जात होते, परंतु आता ४ ते ५ दिवसांत ते बरे होतात आणि आयसोलेशन देखील ७ दिवसांत संपते. त्यानंतर ते पुन्हा ड्युटीवर रुजू झाले असले तरी वरील समस्या त्यांच्यात दिसून येत आहे. आता ही समस्या काही दिवस राहते की दीर्घकाळ राहते हे पाहावे लागेल

पाठदुखीची समस्या सामान्य -

सध्या या आजारातून बरे होणाऱ्या लोकांमध्ये थकवा, शरीरदुखी, विशेषत: पाठदुखीची समस्या दिसून येत आहे. बर्‍याच वेळा तापासह शरीरदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते, जी बरी होण्यास थोडा वेळ लागतो. सध्या याला पोस्ट कोविड समस्या म्हणणे खूप घाईचे आहे. ठोस निरीक्षणासाठी किमान तीन आठवडे वाट पहावी लागेल. त्यानंतर आणखी काय त्रास होतो हे कळेल - डाॅ. तृप्ती गिलाडा, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ, मसिना रुग्णालय

मल्टी व्हिटॅमिन आणि पौष्टिक आहार-
तिसऱ्या लाटेत बाधित झालेले अनेक रुग्ण फाॅलो अपसाठी ओपीडीमध्ये येतात. आजारपणानंतर अशक्तपणा, थकवा जाणवणे आणि डोकेदुखी किंवा शरीर दुखणे अशी समस्या आहे. अशा परिस्थितीत, त्यांना मल्टीव्हिटामिन दिले जाते आणि पौष्टिक आहार घेण्यास सांगितले जाते जेणेकरून त्यांचे आरोग्य सुधारेल. सध्या, कोणताही मोठा पोस्ट कोविड प्रभाव दिसून आलेला नाही - डाॅ. विद्या ठाकूर ,मुख्य वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT