'शाळा सुरु करा, अन्यथा आम्ही स्वत: सुरु करु'; MESTA चा राज्य सरकारला इशारा

5 फेब्रुवारीपर्यंत सरसकट शाळा (School) बंदच्या राज्य सरकारचा निर्णय मान्य नसून या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचही महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन म्हंटलं आहे.
'शाळा सुरु करा, अन्यथा आम्ही स्वत: सुरु करु'; MESTA चा राज्य सरकारला इशारा
'शाळा सुरु करा, अन्यथा आम्ही स्वत: सुरु करु'; MESTA चा राज्य सरकारला इशारा Saam Tv
Published On

नागपूर : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेस्टा) 17 जानेवारी पासून शाळा सुरू करणार असून, राज्य सरकारनं स्वतः इंग्लिश शाळा सुरू कराव्यात अन्यथा आम्ही त्या सुरू करू असा इशाराच महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनने (Maharashtra English School Association) राज्य सरकारला दिला आहे.

कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य सरकारने दहावी आणि बारावीचे वर्ग सोडता सरसकट शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच शाळा बंद केलेल्या विद्यार्थ्यांच ऑनलाईन वर्ग घेण्याची मुभा दिली आहे. मात्र शासनाचा हा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनला मान्य नाही. 15 फेब्रुवारीपर्यंत सरसकट शाळा (School) बंदच्या राज्य सरकारचा निर्णय मान्य नसून या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचही महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन सांगितलं आहे.

'शाळा सुरु करा, अन्यथा आम्ही स्वत: सुरु करु'; MESTA चा राज्य सरकारला इशारा
Nashik : नाशिकमध्ये कलम 144 लागू ; जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरही राहणार बंद

दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहमतीने आणि विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसारच आपण शाळा सुरु करणार असून पुर्ण वर्गाच्या 50 टक्के क्षमता किंवा दोन शिफ्ट मध्ये करणार शाळा सुरू करणार असल्याचही असोसिएशन स्पष्ट केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com