Veins Swelling Symptoms saam tv
लाईफस्टाईल

रक्तवाहिन्यांसबंधित विकारात दिसतात 'ही' लक्षणं; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला, तज्ज्ञांनी दिली माहिती

हे दुष्परिणाम शरीराच्या आत, त्वचेवर किंवा गुप्तांगांच्या आत खोलवर असलेल्या संवेदनशील भागात होऊ शकतात. जर वेळीच उपचार न केले तर ते संपूर्ण शरीरात खराब रक्त प्रवाह आणि ऊतींचे नुकसान अशा गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आर्टिरिओव्हेनस मॅफॉर्मेशन किंवा एव्हीएम हा रक्तवाहिन्यांचा एक विकार आहे जो शरीरात कुठेही होऊ शकतो. ही गंभीर स्थिती आहे जी तेव्हा उद्भवते जेव्हा रक्तवाहिन्या सामान्य रक्तप्रवाहात व्यत्यय आणत असामान्यरित्या जोडल्या जातात. कालांतराने यामुळे जास्त वेदना, सूज आणि अगदी रक्तस्त्राव यासारखे अनेक अस्वस्थ करणारे दुष्परिणाम होऊ शकतात.

हे दुष्परिणाम शरीराच्या आत, त्वचेवर किंवा गुप्तांगांच्या आत खोलवर असलेल्या संवेदनशील भागात होऊ शकतात. जर वेळीच उपचार न केले तर ते संपूर्ण शरीरात खराब रक्त प्रवाह आणि ऊतींचे नुकसान अशा गंभीर गुंतागुंती निर्माण करतात.

पुण्यातील मदरहुड रूग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरी जगदाळे म्हणाल्या की, एव्हीएम किंवा अँजिओकेराटोमीची अनेक लक्षणं एखाद्याला व्यक्तीमध्ये दिसून येऊ शकतात. यामध्ये वेदना होणे, सूज, संवेदनशीलता, त्वचेवर लाल किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके, खाज सुटणे, जळजळ होणे, प्रभावित भाग सुन्न पडणे, प्रभावित भागात उबदारपणा जाणवणे, सहज जखम होणे, असामान्य रक्तस्त्राव, जखमा हळूहळू बरे होणे, स्पर्श करताच संवेदनशीलता वाढणे, लघवीवाटे रक्त येणे (जर ते जननेंद्रियातील AVM असेल तर) आणि त्वचेची जळजळ यासारखी लक्षणे असू शकतात.

ही लक्षणे त्यांच्या स्थितीनुसार आणि तीव्रतेनुसार तसेच व्यक्तीनुसार बदलू शकतात. या लक्षणांची तीव्रता सौम्य ते गंभीर प्रकारची असू शकते. यामुळे होणाऱ्या वेदना एखाद्याच्या जीवनशैलीवर लक्षणीय परिणाम करू शकतात ज्यामुळे त्यांची दैनंदिन जीवनशैली पार पाडणे कठीण होऊ शकते. जर लक्षणे वाढू लागली तर पुढील निदानासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना भेटण्यास उशीर करू नका कारण त्यामुळे तुमची लक्षणे आणखी बिघडू शकतात.

प्रतिबंध करण्यासाठी टिप्स

• नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. वेळीच निदान झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

• कोणत्याही प्रकारच्या आघात किंवा दुखापतीपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी संवेदनशील भागांवर जास्त दबाव येईल अशा क्रिया करणे टाळा.

• त्वचेतील बदलांचे बारकाईने निरीक्षण करा आणि कोणत्याही प्रकारचे डाग आढळल्यास त्वरित निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

• शरीरात चांगला रक्त प्रवाह राखण्यासाठी हायड्रेटेड आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा.

• सौम्य स्किनकेअर उत्पादने वापरा. ​​रासायनिक घटकांचा समावेश असलेल्या उत्पादनांचा वापर टाळा.

• जर तुम्हाला जखमा होऊन रक्तस्त्राव सुरू झाल्यास त्या भागाची स्वच्छता ठेवून त्यांची अत्यंत काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्लीत शक्तीशाली स्फोट, आगीचे लोळ, धुराचे लोट; रस्त्यावर रक्ताचा सडा, हादरवून टाकणारे PHOTO

Puffed Chapati Tricks: चपाती तव्यावर नीट शेकत नाही? लगेचच वातड होते? मग ही भन्नाट टिप ठरेल बेस्ट

Bomb Blast in Delhi: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट

Breast Shape Change: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT