Daily Salt Intake: जास्त मीठ वाढतोय तुमचा रक्तदाब, तज्ज्ञांची माहिती; पाहा दिवसातून किती प्रमाणात मीठ खाल्लं पाहिजे?

Daily Salt Intake: ⁠क्षारांमध्ये मीठ किंवा सोडूयम महत्वाचा घटक आहे. परंतु जास्त मीठ खाल्यानं किंवा वरुन मीठ घेतल्याने रक्तामध्ये रक्ताच्या घनतेत बदल होतो.
salt inktake
salt inktakesaam tv
Published On

कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन हे वाईट असतं. त्यामुळे कोणतेही अन्नपदार्थ खायचे झाले तर ते प्रमाणात खावेत. दररोज आपण एक मीठाचं सेवन करतो. मात्र तुम्ही करत असलेल्या मीठाचं सेवन हे अधिक असतं. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्याने तुमचा रक्तदाब वाढतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आहारात अतिप्रमाणात मीठ घेणं टाळलं पाहिजे.

salt inktake
Right Weight For Age : वयोमानानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? कसं मोजाल वय आणि वजनाचं गणित, पाहा चार्ट

पुण्यातील आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं की, आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला आवश्यक असलेल्या अन्न घटकांमध्ये प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेटस् बरोबरच पाणी आणि क्षार हे देखील महत्वाचे घटक असतात. ⁠क्षारांमध्ये मीठ किंवा सोडियम महत्वाचा घटक आहे. परंतु जास्त मीठ खाल्यानं किंवा वरुन मीठ घेतल्याने रक्तामध्ये रक्ताच्या घनतेत बदल होतो. त्यामुळे आपला रक्तदाब वाढतो. परीणामी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात

salt inktake
कॅन्सरची गाठ शरीरात तयार होत असताना दिसतात 'हे' मोठे बदल

डॉ. भोंडवे पुढे म्हणाले की, अतिप्रमाणात मीठाचं सेवन केल्यानंतर ह्रदयविकार, पॅरॅलिसीस, किडनी खराब होणं, डोळ्यांवर परिणाम होणं असं त्रास जाणवू लागतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मीठ खाणं टाळलं पाहिजे. ⁠हिरव्या भाज्या, फळे यामधून देकील आपल्याला क्षार मिळत असतात.

salt inktake
वयानुसार व्यक्तीने किती पावलं चालणं गरजेचं आहे?

दररोज किती प्रमाणात मीठ खाल्लं पाहिजे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, प्रौढांसाठी दररोज सोडियमचं सेवन २००० मिलीग्रामपेक्षा कमी करण्याची शिफारस केली जाते. हे दररोज ५ ग्रॅम मीठ (सुमारे एक चमचा) इतकं आहे.

मीठाचं सेवन कोणी करू नये?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये जेवणात सामान्य मिठाऐवजी पोटॅशियमयुक्त कमी-सोडियम मीठ वापरण्याची शिफारस केली आहे. हे फक्त प्रौढ आणि निरोगी लोकांसाठीच सांगण्यात आलं आहे. त्याच वेळी, मुले, गर्भवती महिला आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांना सामान्य मीठ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

salt inktake
Lung Cancer: धक्कादायक! सिगारेट ओढणाऱ्यांच्या तुलनेत न ओढणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त, काय आहे नेमका प्रकार ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com