तरुणपणाचा टप्पा पार केला की, आजारपणं आपल्या जवळ येतायेत असं आपल्याला जाणवायला लागतं. आपण तरुणपणी जे खातो, जितकं फीट राहतो तितकंच फीट आपण म्हातारपणात किंवा वयाच्या साठीच्या टप्प्यात असतो. पण सध्याची जीवनशैली खूप वेगळी आहे. आधीसारखं आता पौष्टीक अन्न खाल्लं जात नाही, शिवाय माणसाला जास्त हालचाल किंवा घाम गाळायलाही आवडत नाही. त्यातला एक म्हणजे वाढता रक्तदाब आहे.
जेव्हा तुम्हाला BPचा त्रास सुरु होतो. तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टीत बदल करावे लागतात. तुमचं डाएट, तुमच्या झोपण्याच्या वेळा, व्यायामासाठी वेळ असे अनेक घटक त्यामध्ये येत असतात. जर तुम्ही यावर वेळीच उपचार केले नाहीत. तर तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
तुम्हाला जर BP चा त्रास असेल तर तुम्ही सतत डॉक्टरकडे जाण्याऐवजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने BP तपासू शकता. All India Institute of Medical Sciences येथील न्यूरोलॉजिस्ट Dr Priyanka Sehrawat यांच्या मते, घरच्या घरी BP मोजणे सोपे आहे, पण काही नियम पाळणे अत्यावश्यक आहे.
घरच्या घरी BP मोजताना पाळा हे 5 नियम
१. BP मोजण्याआधी ५ ते १० मिनिटं शांत बसा. कोणतीच हालचाल, खाणं, व्यायाम टाळा.
२. BP मोजण्याआधी लघवी करुन घ्या. फुल ब्लॅडरमुळे BP रीडिंग जास्त येऊ शकतं.
३. कॅफिन टाळायचा प्रयत्न करा. BP मोजण्याच्या 30 मिनिटं आधी चहा, कॉफी किंवा सिगारेट टाळा.
४. जेवणानंतर लगेच BP तपासू नका. कारण तेव्हा रक्तदाबात तात्पुरता बदल होतो.
५. योग्य पोश्चर ठेवून बसा. BP तपासताना हा मुद्दा लक्षात घ्या. पाठीला आधार द्या, हात टेबलवर सरळ ठेवा. वाकून बसू नका.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.