Sakshi Sunil Jadhav
तुम्ही डाएट करत असाल किंवा तुम्हाला हलका नाश्ता खायला आवडत असेल तर तुम्ही मुगाच्या उसळीचे धिरडे तयार करु शकता. ही सोपी रेसिपी आहे.
1 कप मोड आलेली मुगाची उसळ, दीड कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बेसन, 1 कांदा बारीक चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या इ.
अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ, कोथिंबीर चिरलेली, पाणी, तेल इत्यादी साहित्य पुरेसं आहे.
मोड आलेली मुगाची उसळ थोडीशी मॅश करून घ्या, पण पूर्ण पेस्ट करू नका.
एका भांड्यात तांदळाचं पीठ, बेसन आणि मॅश केलेली उसळ एकत्र करा.
आता त्यामध्ये कांदा, हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर घाला.
थोडं थोडं पाणी घालून घट्ट पण ओतता येईल असं बॅटर तयार करा. दुसरीकडे तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल लावून घ्या.
तयार बॅटर तव्यावर घालून पातळ गोल आकारात पसरवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
गरमागरम धिरडे हिरव्या चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा याने चव दुप्पट वाढते.