hypertension diet google
लाईफस्टाईल

Blood Pressure: BPच्या रुग्णांनी आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅकचा धोका होईल दूर, वाचा डॉक्टरांचा सल्ला

Hypertension: उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी केळी, बीट, डार्क चॉकलेट, डाळिंब आणि आलं यांचा आहारात समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. लोक कामानिमित्त बराचवेळ घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना २ वेळचा डबा घेऊन जाणं जमत नाही. मग बाहेरचं थोड्या प्रमाणात काहीतरी चटपटीत खाणं होतंच. पण थोडं-थोडं म्हणत आपल्याला त्याच चटपटीत पदार्थांची चटक लागते. मग आपण घरी जरी ते पदार्थ केले तरी आपल्याला त्याची टेस्ट लागत नाही. यामध्ये लहानमुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचाच समावेश होतो.

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही नियमित घरचा पौष्टीक आहार घेत नसाल तर भविष्यात तुम्हाला खूप गंभीर आणि जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये तुमचं फॅट वाढतं आणि तुम्हाला हार्ट संबंधीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मग अशावेळेत तुम्ही आहारात महत्वाचे बदल करणं गरजेचं असतं. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला हृदयविकार, स्ट्रोक तसेच किडनी निकामी होणे अशा गंभीर समस्यांना सामोरं लागू शकतं. पुढील माहितीत आपण ब्लड प्रेशर किंवा Hypertension असणाऱ्या रुग्णांच्या आहारात कोणते पदार्थ असायला हवेत? याबद्दल जाणून घेणार आहोत.

केळी हा पोटॅशियमचा उत्तम स्रोत मानला जातो. शरीरातले सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यास पोटॅशियम मदत करतेय. त्याने रक्तवाहिन्यांवरचा अधिकचा ताण कमी होतो. नियमित केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डार्क चॉकलेट हे सुद्धा हृदयासाठी फायदेशीर मानलं जातं. ७० टक्के कोको पावडर असलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्हनॉल्स असतात. त्याने शरीरातल्या नायट्रिक ऑक्साइडचं उत्पादन वाढतं. तसेच रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो.

बीट हे नायट्रेट्सने समृद्ध असलेले सुपरफूड आहे. शरीरात हे नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारित होतात आणि रक्तदाब कमी होतो. बीटचा ज्यूस किंवा भाजीत वापर करुन खाल्ल्याने तुम्हाला जास्त फायदा होतो.

डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करतात. तसेच डाळिंब एसीई (ACE) एन्झाइमला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्याने तुमच्या रक्तदाबावर चांगला परिणाम होतो. रोज डाळिंब किंवा त्याचा रस घेतल्याने हृदयाचे आरोग्य सुधारतं.

आलं हा आणखी एक नैसर्गिक उपाय मानला जातो. आल्यामध्ये असे बायोअॅक्टिव्ह घटक असतात जे रक्तवाहिन्या सैल करण्यास मदत करतात. हे घटक काही प्रमाणात रक्तदाबाच्या औषधांप्रमाणे कार्य करतात. आल्याचा वापर चहा, भाज्या किंवा स्मूदीमध्ये केला जातो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, हे पदार्थ आहारात रोज घेतल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT