Sakshi Sunil Jadhav
आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे डाएट फॉलो करत आहेत. अशातच नाचणी खाणं योग्य की अयोग्य याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो.
नाचणीत मोठ्या प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त भूक लागत नाही.
नाचणी खाल्ल्याने भूक कमी लागते. त्यामुळे एकूण कॅलरी इनटेक कमी होतो.
नाचणीचा GI कमी असल्याने रक्तातली साखर हळूहळू वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वजन कमी करताना स्नायू टिकवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं. नाचणीमध्ये मध्यम प्रमाणात प्रोटीन असतं.
नाचणी सहज पचते आणि पचनसंस्थेला सुधारण्यास मदत करते. पण ती जास्त प्रमाणात खाल्ल्याने नुकसान होऊ शकतं. त्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.
सकाळी किंवा दुपारच्या जेवणात नाचणी खाणं फायदेशीर ठरतं. रात्री टाळणं चांगलं.
नाचणीचे लाडू, बिस्किटं किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यास वजन वाढू शकतं.
फक्त नाचणी खाल्ल्याने वजन कमी होत नाही. त्यासोबत व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे.
नाचणी खाणं वजन कमी करण्यासाठी योग्य आहे, पण ते मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलं तरच फायदा होतो.