आजच्या सोशल मीडियाच्या जगात जेवणापूर्वी प्रत्येकजण आपल्या डिशचा फोटो घेण्याकडे जास्त लक्ष देतो. पण कल्पना करा, असे एक रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला जेवण दिसणारच नाही. हो, हे अगदी खरं हा, डार्क डायनिंग म्हणजेच अंधारात जेवण करण्याचा अनोखा अनुभव तुम्हाला हॉटेलमध्ये घेता येतो. ही अनोखा संकल्पना सर्वप्रथम १९९० च्या दशकात युरोपमध्ये आली.
पॅरिसमध्ये १९९७ साली Le Gout du Noir नावाचे जेवण अंधारात करण्याचे पहिले ठिकाण सुरू झाले. त्यानंतर स्वित्झर्लंड येथे ब्लाइंडेकुड या नावाचं जगातील पहिलं कायमस्वरूपी ब्लॅकआउट रेस्टॉरंट स्थापन झालं. Blindekuh म्हणजे जर्मन भाषेत ब्लाइंड मॅन स बफ हा एक खेळ ज्यात डोळे बांधून इतरांना पकडायचं असतं तो सुरु केला. हे रेस्टॉरंट १९९९ साली आंधळे धर्मगुरू जोर्ग स्पिलमन यांनी स्थापन केले. त्यांची कल्पना होती की लोकांना अंधारात जेवणाचा अनुभव देऊन दृष्टिहीनांच्या जगाचा अनुभव मिळावा. ईथे काम करणारे सर्व कर्मचारी दृष्टिहीन आहेत. पाहुण्यांना अंधारात नेऊन बसवले जाते आणि सर्व्हर त्यांना जेवणाचे साधन कसे वापरायचे? ग्लास आणि प्लेट कुठे आहेत? हे समजावतात.
या अंधारातील जेवणाचा उद्देश फक्त वेगळा अनुभव देणे नाही, तर दृष्टिहीनांच्या भावनांची जाण निर्माण करणे आहे. प्रकाश नसल्यामुळे इतर चव, सुगंध आणि स्पर्श जास्त तीव्र होतात. जेवणाचा प्रत्येक घास, त्याचा सुगंध आणि पोत जास्त गहिरेपणाने जाणवतो.
आज डार्क डायनिंग ही संकल्पना जागतिक पातळीवर लोकप्रिय झाली आहे. युरोपपासून सिंगापूर, व्हिएतनाम, कॅनडा आणि भारतापर्यंत अशा अनेक ठिकाणी हा अनोखा अनुभव उपलब्ध आहे. भारतात सक्षम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने नाईट ऑफ द सेन्सेस या उपक्रमाद्वारे अंधारात जेवणाचा अनुभव देणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. हा अनुभव फक्त जेवणापुरता मर्यादित नाही, तर मानवी संवेदना आणि समज वाढवणारा एक प्रयत्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.