Reason of Bleeding Gums saam tv
लाईफस्टाईल

Bleeding Gums: दात घासताना वांरवांर हिरड्यांमधून रक्तस्राव होतोय? 'हे' ४ गंभीर आजार असू शकतात कारणीभूत

Reason of Bleeding Gums: दात घासताना क्वचित हिरड्यांमधून रक्त येणं सामान्य मानलं जातं. परंतु जर हे वारंवार होत असेल तर तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. हिरड्यांमधून रक्त येणं हे काही गंभीर समस्येचं कारण आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दररोज आपण दोन वेळा दात घासतो. मात्र अनेकदा दात घासताना आपल्या हिरड्यांमधून रक्तस्राव होण्याचा धोकाही निर्माण होतो. कदाचित तुम्हालाही दात घासताना असा त्रास होत असेल. परंतु अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही दुर्लक्षित करत असलेली ही गोष्ट अनेक गंभीर आजारांचं कारण बनू शकते हे तुम्हाला माहितीये का?

दात घासताना कधीतरी हिरड्यांमधून रक्तस्राव होणं हे धोकादायक मानलं जातल नाही. मात्र जर ही समस्या सतत होत असेल तर हे तुमच्या हिरड्यांसोबत संपूर्ण शरीरासाठी घातक आहे. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी ज्या हिरड्यांमधून येणाऱ्या रक्तस्रावाच कारण ठरतं.

हिरड्यांची सूज

हिरड्यांना सूज येण्याच्या समस्येने हिरड्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो. या स्थितीत, हिरड्यांमध्ये सूज आणि इन्फेक्शन अशी लक्षणं दिसून येतात. जी दातांवर जमा झालेल्या प्लेक आणि बॅक्टेरियामुळे होतात. दात घासतेवेळी सूज आणि रक्तस्त्राव ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. जर त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते खूप गंभीर होऊ शकतं.

पेरिओडोंटायटीस

कालांतराने आणि उपचारांशिवाय हिरड्यांना आलेली सूज पेरिओडोंटायटीसमध्ये बदलू शकते. हे हिरड्या आणि जबड्याच्या हाडांवर परिणाम करतं. यामध्ये तुमचे दात कमकुवत होऊ लागतात. यामध्ये देखील तुमच्या हिरड्यांमधून सतत रक्त येणं, तोंडाची दुर्गंधी येणं, दात सैल होणं अशी लक्षणं दिसू शकतात.

हार्मोनल बदल

हार्मोन्समध्ये होणारे बदल हे देखील हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्रावाला कारणीभूत ठरतात. हा त्रास अधिकतर महिलांमध्ये दिसून येतो. महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान, मासिक पाळी दरम्यान किंवा रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हिरड्यांना सूज येऊ शकते. परिणामी त्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो.

जीवनसत्त्वाची कमतरता

अनेकांना याची कल्पना नसते, मात्र शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होत असतो. यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के जबाबदार ठरतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्या कमकुवत होतात आणि वारंवार रक्तस्त्राव होतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT